विशेष प्रतिनिधी
बंगलोर : सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 46 वर्षांचे होते. बंगलोरमधील विक्रम हॉस्पिटलमध्ये ते काही काळापासून अॅडमिट होते.
Kannada film actor Puneet Rajkumar dies of heart attack
कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना अपु या नावाने ओळखले जायचे. ते एक उत्तम अभिनेता, एक सिंगर, टेलिव्हिजन रिप्रेझेंटेटीव्ह आणि निर्माते म्हणून काम करायचे. त्यांनी आजवर 29 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. काल रात्री 11.30 वाजता छातीमध्ये दुखू लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. डॉक्टरांची एक टीम सतत त्यांना मॉनिटर करत होते. विक्रम हॉस्पिटल मधील डॉ. रंगनाथ नायक यांनी त्यांची परिस्थिती चिंताजनक होती असे सांगितले होते.
वसंता गीता, भगवंता, चालीसुवा मोडागाळू, इरेडू नक्षत्रगालू, बेटाडा होऊ हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत. यापैकी बेटाडा होऊ(1985) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार या कॅटेगरी मधील राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते.
त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अभिनेता सोनू सूद यांनी ट्विटकरून आपले दु:ख व्यक्त केले आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या फॅन्सना प्रचंड धक्का बसला आहे.
Kannada film actor Puneet Rajkumar dies of heart attack
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik Vs Sameer Wankhede : नवाब मलिकांनी सांगितले दाढीवाल्याचे नाव, म्हणाले- “काशिफ खान क्रूझवर हजर होता, तो सेक्स रॅकेट चालवतो! वानखेडेंशी त्याचे संबंध!”
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू छोटा राजनची 38 वर्षांनी एका खटल्यातून निर्दोष सुटका, हे होते प्रकरण
- लष्करप्रमुख नरवणे म्हणाले, ‘लवकरच माझ्या जागी महिला असेल’, एनडीएचे दरवाजे महिलांसाठी खुले झाल्याचे केले कौतुक
- बांगलादेश हिंसाचार: हसीना सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा – एकही मंदिर पाडले नाही, मुस्लिमांचाच जास्त मृत्यू झाला