• Download App
    कभी खुशी कभी गम, चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण, जॉनी लिव्हर यांनी आपल्या मुलासोबत रीक्रिएट केला चित्रपटातील हिट सीन | Kabhi Khushi Kabhi Gam, 20 years since the movie release, Johnny Lever recreated hit scene with his son

    कभी खुशी कभी गम, चित्रपटाला २० वर्ष पूर्ण, जॉनी लिव्हर यांनी आपल्या मुलासोबत रीक्रिएट केला चित्रपटातील हिट सीन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन काल 20 वर्षं पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट एक सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटा मध्ये तगडी स्टारकास्ट होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर खान, जॉनी लीवर असे अभिनेते या चित्रपटामध्ये झळकले होते. या चित्रपटातील प्रत्येक कॅरॅक्टरने आपली एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली होती.

    मागील कित्येक दशकांपासून जॉनी लिव्हर यांनी प्रेक्षकांचे सतत मनोरंजन केलेलं आहे.

    Kabhi Khushi Kabhi Gam, 20 years since the movie release, Johnny Lever recreated hit scene with his son

    या चित्रपटामधील विनोदी मिठाईवाल्याचे पात्र निभावणारे अभिनेते जॉनी लिव्हर यांनी या चित्रपटाच्या आठवणी रीक्रिएट करणारा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.


    करण जोहर म्हणाला, माझी आई एक ‘सुपरहिरो’, आठ महिन्यांत झाल्या दोन शस्त्रक्रिया!


    कभी खुशी कभी गम या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आपला भाऊ शाहरुख खान याला शोधण्यासाठी विचारपूस करण्यासाठी जॉनी लिव्हर यांच्याकडे येतो. या सीनचे रिक्रिएशन जॉनी लिव्हर आणि त्यांच्या मुलाने केले आहे. चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर यांचा मुलगाच होता हे आता बऱ्याच प्रेक्षकांना कळत आहे. त्यामुळे इंटरनेटवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. धर्माने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

    https://www.instagram.com/reel/CXQ_L6pjHUW/?utm_source=ig_web_copy_link

    कभी खुशी कभी गम या चित्रपटातील गाण्यांनी, मूव्हिच्या सेट्स, लुक्सनी प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. सोबत करण जोहारचे दिग्दर्शन. करण जोहर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. रॉकी और राणी की अनोखी प्रेमकहाणी हा करण जोहर दिगदर्शीत सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत.

    Kabhi Khushi Kabhi Gam, 20 years since the movie release, Johnny Lever recreated hit scene with his son

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी