• Download App
    इन्स्टाग्राम रिल्स दुनिया : हार्डी सिंधूचे लेटेस्ट बिजली बिजली गाणे होतेय तुफान व्हायरल | Instagram Reels World: Harrdy Sindhu's Latest Bijliee Bijlee is latest viral song

    इन्स्टाग्राम रिल्स दुनिया : हार्डी सिंधूचे लेटेस्ट बिजली बिजली गाणे होतेय तुफान व्हायरल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : फावल्या वेळात आपण सगळे जण मोबाइल घेऊन बसतो. मग इन्स्टाग्राम ओपन करतो. कधी कोणत्या रेसिपीचे, कधी कुकिंग शोचे, कधी एखाद्या अभिनेत्रीचा डान्स रील तर कधी विनोदी रील असे बरेच रिल्स आपण स्क्रोल करत जाऊ तसे आपल्याला पाहायला मिळतात. पण सध्या प्रत्येक स्क्रोल नंतर एकच गाणं ऐकायला मिळतेय ते म्हणजे हार्डी सिंधूचे लेटेस्ट बिजली बिजली हे गाणे.

    Instagram Reels World: Harrdy Sindhu’s Latest Bijliee Bijlee is latest viral song

    इतर बाकी पंजाबी प्रमोशनल गाण्या सारखंच हे गाणं आहे. लिरिक्स असेच आहेत. या गाण्यामध्ये असं काय आहे जे लोकांना आवडतंय? असं अजिबात होत नाही की इन्स्टाग्रामवर ह्या गाण्याची रील पहिली आणि आपण यूट्यूबवर जाऊन हे गाणं ऐकत नाही. बहुधा या गाण्याचे बीट चांगले आहेत किंवा ह्या गाण्याच्या व्हिडीओचा लुक चांगला आहे किंवा हार्डी सिंधुचा आवाज. गाण्याचे हे लीरिक्स ऐकले की मस्त डान्स करण्याची इच्छा होतेय ती वेगळी. जेव्हा की ह्या लिरिक्सचा अर्थ काहीही कळत नाही. असे हे गाणे एकदम मस्त डान्स करायला भाग पाडणारे आहे.

    ‘ओह छान्न दी कूदी बदलन दी बेहन
    सारे टैनउ बिजली बिजली कहाँ
    जिहदे उत्ते गिर्दी बछड़ा वी कक नि
    तारे वी दर्र के रेहान
    ओह सिंडरेला!’


    अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा


    ते काहीही असो. इन्स्टाग्रामच्या प्रत्येक रिल्स मध्ये सध्या हे गाणे पाहायला मिळते. बरेच सेलिब्रेटी देखील आपल्या व्हिडिओजसाठी हे गाणे वापरताना दिसून येत आहेत. या गाण्यामध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलकने आपले अॅक्टिंग डेब्यू केले आहे.

    Instagram Reels World: Harrdy Sindhu’s Latest Bijliee Bijlee is latest viral song

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी