• Download App
    भारतीय 21 वर्षीय कश्यपने 'स्पायडर मॅन : नो वे होम' सिनेमाच्या टीव्ही कमर्शियल साठी कंपोज केले गाणे | Indian 21-year-old Kashyap composes song for TV commercial of 'Spider-Man: No Way Home' movie

    भारतीय २१ वर्षीय कश्यपने ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ सिनेमाच्या टीव्ही कमर्शियल साठी कंपोज केले गाणे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नुकताच ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ह्या सिनेमाचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. मार्व्हलचा सिनेमा आणि मार्व्हल सिनेमाचे चाहते यांना काही तोड नाही. तुम्हाला माहित आहे का? या सिनेमाच्या टीव्ही कमर्शियल अॅडसाठी एक गाणे वापरण्यात आले होते ते भारतीय म्युजीक कंपोजने कंपोज केलेले आहे. ‘स्टार्ट द मशीन’ असे या गाण्याचे नाव आहे.

    Indian 21-year-old Kashyap composes song for TV commercial of ‘Spider-Man: No Way Home’ movie

    भारतातील 21 वर्षीय कश्यप याने हे गाणे कंपोज केले आहे. कश्यप हा फक्त 21 वर्षांचा आहे. पण तो एक रेकॉर्ड प्रोड्यूसर, म्युझिक कम्पोजर, इन्स्टुमेन्टालिस्ट, सिंगर, सॉंग रायटर आहे. अगदी लहान वयामध्ये म्हणजे जेव्हा तो 6 वर्षांचा होता, तेव्हा त्याने पियानो प्ले करायला शिकले होते. त्यानंतर त्याने आपले करिअर संगीत क्षेत्रात करण्याचे ठरवले.

    https://www.instagram.com/p/CXivKQDB__R/?utm_source=ig_web_copy_link


    ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ या सिनेमाचा दुसरा ट्रेलर मंगळवारी झाला प्रदर्शित


    आजवर त्याने अनेक बॉलीवूड सिनेमांसाठी असिस्टंट म्युझिक डायरेक्टर म्हणून काम केले आहे. साहो, असुरन अशा अनेक सिनेमांसाठी त्याने असिस्टंट म्युझिक कम्पोजर म्हणून काम केले आहे. आणि तो फक्त 21 वर्षांचा आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने या स्टार्ट द मशीन या म्युझिक ट्रॅक विषयी माहिती दिली आहे. आणि सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येतोय.

    Indian 21-year-old Kashyap composes song for TV commercial of ‘Spider-Man: No Way Home’ movie

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी