विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा चुकीचा वापर केला जात आहे. असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यानंतर याच ईडीच्या रेडबद्दल आपले मत व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ईडीने नवा विक्रम केला आहे. अनिल देशमुख यांच्या घरी तब्बल सात वेळा रेड टाकण्यात आली होती. आणि एकाच ठिकाणी इतक्या वेळा रेड टाकल्याने केंद्र सरकारने एक नवा विक्रम केला आहे. यामध्ये काहीतरी वेगळे आहे. असे त्यांनी ईडीच्या छापेमारीवर टोला लगावताना म्हटले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
If an innocent child has to stay in jail for 26 days when nothing is found, then what is the justice? ; Supriya Sule
आर्यन खानची नुकताच आर्थर रोड तुरुंगातील जेलमधून बेलवर मुक्तता करण्यात आली आहे. यावरत्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की एक आई म्हणून या गोष्टींसाठी सुरुवातीला उत्तर देऊ इच्छिते आणि त्यानंतर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून बोलेन एक आई म्हणून कुठल्याही आईला हा विषय दु खदायकच आहे कोणत्याही कुटुंबात असे होणे ही खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे.
पुढे त्या म्हणाल्या, त्या मुलाकडे काहीच मिळालेले नाही अशी माहिती समोर आली आहे. एखाद्या निर्दोष मुलाला 26 दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असेल, तर हा कुठला न्याय आहे? एक समाज म्हणून आपण या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आणि केंद्र सरकारने या गोष्टींवर नक्कीच उत्तर दिले पाहिजे. एखाद्या अधिकारि चुकीचे काम करत असल्यास त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि या सर्व गोष्टींमुळे बॉलीवूडचे नाव जगामध्ये खराब होत आहे. अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली.
If an innocent child has to stay in jail for 26 days when nothing is found, then what is the justice? ; Supriya Sule
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द