• Download App
    करवा चौथ सारख्या प्रथेवर मी विश्वास ठेवत नाही : रिया कपूर | I don't believe karawa chouth : riya kapoor

    करवा चौथ सारख्या प्रथेवर मी विश्वास ठेवत नाही : रिया कपूर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अनिल कपूर यांची मुलगी आणि सोनम कपूरची बहीण रिया कपूर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. 14 ऑगस्ट रोजी रियाने तिचा 12 इयर लाँग टाइम बॉयफ्रेंड करण सोबत लग्न केले आहे. लग्नानंतर त्या दोघांच्या लग्नाचे बरेच फोटो व्हायरल होत असल्याचे अजूनही दिसून येत आहे. पण रिया सध्या चर्चेत आहे ते तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे. इन्स्टाग्राम पोस्टवरून तिने आपल्या करवा चौथ ह्या उपवासाच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    I don’t believe karawa chouth : riya kapoor

    या पोस्टमध्ये रिया लिहिले की, मला मोठ्या सन्मानाने तुम्हाला सांगावेसे वाटते की करवा चौथच्या निमित्ताने मला कोणीही प्लीज कोणतीही भेटवस्तू पाठवू नका. तसेच हा उत्सव साजरा करण्यासाठी माझ्याकडे येऊ देखील नका. या सर्व गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. जे लोक हा सण साजरा  करतात, त्या सर्व जोडप्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. पण माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नाहीये. अशा गोष्टींचा प्रचार करणे, जाहिरात करणे हे माझ्या आयुष्यात कधीही मी करणार नाही. असे रियाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.


    वायूसेनेच्या गणवेशात आक्षेपार्ह वक्तव्ये, अनिल कपूर यांनी मागितली माफी


    पुढे ती असंही लिहिते की, सध्या मला असे वाटते की आम्ही दोघांनी स्वतः ची आणि एकमेकांची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे. हे लिहिण्यामागचे कारण असे की, काही लोक मला वारंवार सांगताहेत की हे व्रत मी केले पाहिजे. तर त्या सर्व लोकांचे मी आभार मानते की तुम्ही मला इतका मोठा मोलाचा सल्ला दिला. अपेक्षा करते तुमचा रविवार आनंदात जाईल. असा टोलादेखील तिने या पोस्टमधून लगावला आहे.

    रियाच्या या पोस्टमुळे बॉलिवूड मध्ये एकदम फॅन्सी स्टाईल मध्ये दाखवण्यात येणाऱ्या करवा चौथ ह्या प्रथेवर पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे. हे व्रत केल्याने आपल्या नवऱ्याचे आयुष्य खरंच सुरक्षित राहू शकते का?  किंवा वडाची पूजा केल्यानंतर तोच नवरा सात जन्म मिळतो का? काय गॅरंटी आहे? एव्हाना माणसाला सात जन्म असतात का? अश्या अनेक प्रश्नांची लॉजिकल उत्तरे आजवर कोण देऊ शकले आहे?

    I don’t believe karawa chouth : riya kapoor

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी