• Download App
    'हाउस ऑफ द ड्रॅगन्स' सिरीजचा टीजर प्रदर्शित! १ जानेवारी २०२२ रोजी येणार पहिला एपिसोड | 'House of the Dragons' series's teaser is out! First episode will air on 1st January, 2022

    ‘हाउस ऑफ द ड्रॅगन्स’ सिरीजचा टीजर प्रदर्शित! १ जानेवारी २०२२ रोजी येणार पहिला एपिसोड

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : गेम ऑफ थ्रोन्स ही सीरिज जगातील एक सर्वोत्तम सीरिज पैकी एक आहे. यात काहीच वाद नाही. या सीरिजचा शेवटचा एपिसोड एचबीओ या वाहिनीवर आजवरचा सर्वात जास्त लोकांनी पाहिलेला एपिसोड ठरला होता. या सीरिजमधील प्रत्येक पात्रावर लोकांनी भरभरून प्रेम केलं होतं. नाइट किंगला कोण मारणार?, सेव्हन किंग्डम वर कोण राज्य करणार? अश्या अनेक प्रश्नांनी शेवटच्या सीझन पर्यंत डिरेक्टरनी या सीरिज बद्दलची उत्सुकता वाढवली होती.

    ‘House of the Dragons’ series’s teaser is out! First episode will air on 1st January, 2022

    १४ एप्रिल २०१९ रोजी या सीरिजचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला होता. या सीरिजमध्ये प्रत्येक कॅरेक्टरला दिलेली स्पेस अतिशय उत्तम होती. पण शो जिंकणारे ठरले होते ते म्हणजे या सीरिजमध्ये दाखवलेले ड्रॅगन्स. तोंडातून आग ओतणाऱ्या ड्रॅगन्स बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आणि याचमुळे ‘हाउस ऑफ द ड्रॅगन्स’ ही सीरिज लवकरच प्रदर्शित होईल याची घोषणा करण्यात आली होती. आणि आता या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे.


    नुकत्याच नेटफ्लिक्स रिलीज झालेला स्क्विड गेम या वेब सिरीजला मिळत आहे प्रचंड लोकप्रियता, नेमके काय आहे या वेब सिरीज मध्ये?


     

    गेम ऑफ थ्रोन्स मध्ये डॅनी ही मदर ऑफ ड्रॅगन्स म्हणून दाखवली आहे. त्या आधी 200 वर्षांपूर्वी ड्रॅगनचा जन्म कसा झाला, कोणत्या युद्धातून झाला, त्यांचे वंशज कोण, त्या वंशजांनी स्टोरी हा सर्व इतिहास सांगणारी ही सीरिज आहे. १ जानेवारी २०२२ रोजी या सीरिजचा पहिला एपिसोड प्रदर्शित होणार आहे. जॉर्ज आर आर मार्टिन यांनी लिहिलेल्या ‘फायर अँड ब्लड’ या पुस्तकावर आधारित ही सीरिज आहे.

    इमा आरकी, मॅट स्मिथ, ऑलिव्हिया कूक, मिली अल्कोक, पॅडी कौन्सिडीन, इव्ह बेस्ट, ग्रॅहम मॅकटॅव्हिश, सोनियो मिझुनू अशी तगडी स्टारकास्ट या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. या टीझरमधील “Dreams didnt make us kings, Dragons did” या एका वाक्यामुळे ही सीरिज खूपच जास्त प्रॉमिसिंग असणार असे या टीजरवरून तरी दिसत आहे

    ‘House of the Dragons’ series’s teaser is out! First episode will air on 1st January, 2022

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी