विशेष प्रतिनिधी
मुबंई : आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना क्रूझ ड्रग प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. त्या दोघांनाही आता बेल मिळाली आहे. पण दर शुक्रवारी त्यांना एनसीबी ऑफिसमध्ये जाऊन आपली हजेरी नोंदवावी लागते. या शुक्रवारी देखील अरबाज मर्चंट आपल्या वडिलांसह हजेरी देण्यास गेलेला असताना मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांना गाठले.
Have you seen this viral video of Arbaaz Merchant and his father?
एनसीबी ऑफिसच्या बाहेर पडल्यानंतर अरबाजचे वडिल अस्लम मर्चंट फोटोग्राफर्सना पोज देण्यासाठी थांबले. आणि त्यांनी आपला मुलगा अरबाजला पुन्हा बोलावून घेतले. ते फोटोग्राफर्सना एक मोठी दिलखुलास स्माइल देऊन पोज देत होते. त्याने आपल्या वडिलांची बालिश इच्छा पाहून डोक्यावर हात मारला. या गोष्टीला वैतागून अरबाजने स्टॉप इट डॅड असे म्हणून तो निघून देखील गेला. पण सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सर्वत्र अरबाजच्या वडिलांची आणि त्यांना मीडिया फोटोग्राफरना पोज देण्यासाठी असलेल्या हौसेची चर्चा सुरू आहे. या दोन्ही गोष्टींबअतिशय मजेशीररित्या ट्रोल केल्या जात आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा.
Have you seen this viral video of Arbaaz Merchant and his father?
महत्त्वाच्या बातम्या
- आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीला वाहनाची धडक; दोन वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी रुग्णालायात दाखल
- छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी चकमक, एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला केले ठार
- ARJUN KHOTKAR : जालना येथील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी; रात्री २ पर्यंत ED पथक जालन्यात
- RED ALERT : दक्षिण भारतात Red Alert ; सलग 26 दिवस पावसाचा कहर ; केरळसाठी विशेष पूर सूचना