• Download App
    फटाके फोडू नका या ट्विटमूळे हर्षवर्धन कपूर ट्रोल नेटकऱ्यानी अनिल कपूर यांचा फोटो शेअर करत केली टीका | Harshvardhan Kapoor got criticised on social media for his 'don't burn firecrackers' Twitter post

    फटाके फोडू नका या ट्विटमूळे हर्षवर्धन कपूर ट्रोल नेटकऱ्यानी अनिल कपूर यांचा फोटो शेअर करत केली टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. दिवाळी सणानिमित्त काही सेलिब्रिटींनी फटाके फोडून प्रदूषण करू नये अशा पोस्ट केल्या होत्या. हर्षवर्धन कपूरने अशीच एक पोस्ट केली व त्याला लोकांच्या टीकांना सामोरे जावे लागले.

    Harshvardhan Kapoor got criticised on social media for his ‘don’t burn firecrackers’ Twitter post

    हर्षवर्धनने त्याच्या ट्विटर अकाउंटवर असे म्हटले की, “लोक अजूनही फटाके फोडत असून घरातील पाळीव प्राण्यांना त्याचा त्रास होत आहे व घरात सगळेजण अस्वस्थ आहेत.” हे पर्यावरणासाठी वाईट असून लोकांनी सामाजिक भान राखणे गरजेचे आहे.” असे ट्विट त्यानी केले. हर्षवर्धनचे हे ट्विट व्हायरल झाले. यावर प्रतिक्रिया देताना एकाने लिहिले की, “२०१६ च्या दिवाळी मध्ये सोनमच्या डावीकडे उभा असलेला तूच होतास का? तेव्हा तू अनिल कपूर यांना फटाके फोडणेपासून थांबवले नाहीस. तेव्हा तुझी अक्कल कुठे गेली?”


    करवा चौथ सारख्या प्रथेवर मी विश्वास ठेवत नाही : रिया कपूर


    दुसरा नेटकरी म्हणाला की, “तुम्ही सकाळ, दुपार आणि रात्री अश्या तिन्ही वेळच्या जेवणात मांसाहार करता व ते पर्यावरणासाठी हानीकारक नसते का? तुम्ही दररोज एसीरूम मध्ये बसता व जवळच्या जवळ अंतरासाठी सुद्धा गाड्यांचा वापर करता तेव्हा पर्यावरणाची हानी होत नाही का?” अशा प्रकारे प्रतिक्रिया आल्यानंतर हर्षवर्धनने त्याचे ट्विट डिलीट करून टाकले.

    Harshvardhan Kapoor got criticised on social media for his ‘don’t burn firecrackers’ Twitter post

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी