विशेष प्रतिनिधी
मुबंई : हॅरी पॉटर हे नाव घेताच चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते. ज्या मुलांचं बालपण हॅरी पॉटरचे सिनेमे पाहून किंवा पुस्तकं वाचून झालेली आहे त्यांच्यासाठी एक गुडन्यूज आहे. हॅरी पॉटर मधील सर्व कलाकारांचे रियुनियन लवकरच एचबीओ मॅक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे आजवरचे हे पहिले रियुनियन आहे.
‘Harry Potter: Return to Hogwarts’ Harry, Ron, Hermione to reunite on occasion of reunion on January 1, 2022
या युनियनमध्ये चित्रपटाच्या आठही भागांची स्टोरी, मेकिंग, शुटींग यासंबंधीचे किस्से, अतिशय खोलात जाऊन केलेली चर्चा, डिस्कशन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॅनिअल रॅडक्लिफ, रूपर्ट ग्रिंट, इमा वॅटसन म्हणजेच हॅरी, रॉन, हरमायनी या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत. 1 जानेवारी 2022 रोजी हॅरी पॉटर सिनेमाच्या 20 व्या अॅनिव्हर्सरी निम्मित ‘रिटर्न टू हॉगवॉर्ट्स’ हा शो एचबीओ मॅक्सवर प्रदर्शित होणार आहे.
आजच्या दिवशी बरोबर 20 वर्षांपूर्वी हॅरी पॉटरच्या सर्वात पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानिमित्ताने एचबीओ मॅक्सने आपल्या ऑफीशियल इन्स्टाग्राम पेजवरून या नवीन एपिसोड ची घोषणा केली आहे. जुलै 2011 मध्ये हॅरी पॉटरचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर जवळपास 10 वर्षे एकही भाग प्रदर्शित झालेला नव्हता.
या चित्रपटात काम केलेले डॅनिअल रॅडक्लिफ, रूपर्ट ग्रिंट, इमा वॅटसन, हेलेना बोनहाम कारटे, रॉबी कोल्ट्राने, राल्फ फिनिश, गॅरी ओल्डमन, इमेल्डा स्टॅनिऑन, टॉम फलटण, जेम्स फेल्प्स, ओलिव फेल्प्स, मार्क विलियम्स, बोनी वइत, अल्फ्रेड इनॉच, मॅथ्यू लिविस, इव्हाना लिंच ख्रिस कोलंबस इत्यादी कलाकार पुन्हा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत.
इमा वॉटसन हिने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर आपल्या हॅरी पॉटर च्या शूटिंगच्या दिवसांसंबंधीची अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
https://www.instagram.com/p/CWWGFOXLZYs/?utm_source=ig_web_copy_link
‘Harry Potter: Return to Hogwarts’ Harry, Ron, Hermione to reunite on occasion of reunion on January 1, 2022
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘ या ‘ जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू
- Mumbai Cruise Drugs Case : गोसावी आणि खबऱ्याची चॅट उघड, मुंबई पोलीस एसआरकेची मॅनेजर पूजा ददलानी बजावणार तिसरी नोटीस
- पूर्वांचल एक्सप्रेस वे वर झालेल्या विमानांच्या गर्जना काय सांगताहेत…??; वाचा पंतप्रधानांच्या भाषणातून…!!
- मोठी बातमी : उद्यापासून करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा