विशेष प्रतिनिधी
दिल्ली : टायटॅनिक स्टार लिओनार्डो डिकॅप्रियोचा आज वाढदिवस आहे. तो असा 47 वर्षांचा झाला आहे. आजकालच्या कंटेटच्या जमान्यातही फक्त त्याच्या नावावर सिनेमे हाऊसफुल चालतात. लियोनार्डो डिकॅप्रियोचा ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मुन’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. पत्रकार डेव्हिड ग्रँड यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. ओक्लहोमा येथे 1920 मध्ये झालेल्या खुणांवर आधारित हा एक क्राइम सिनेमा असणार आहे.
Happy BirthDay Leonardo DiCaprio
अचानक मिळालेले तेलाचे साठे आणि त्या तेलाच्या साठय़ांवर आपली पोळी भाजून घेण्यासाठी गोऱया लोकांनी तेथील लोकल स्त्रियांसोबत केलेले लग्न आणि हळूहळू एकेकाचा झालेला खून. यावर आधारित हा सिनेमा असणार आहे. अर्नेस्ट बुरखाची भूमिका डिकॅप्रियोने या सिनेमात निभावली आहे.
जाणून घेऊया लिओनार्डो डिकॅप्रियोच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी ;
1. टायटॅनिक अभिनेता लियोनार्डोचे भारतीय कनेक्शन तुम्हाला माहीत आहे का? त्याची सावत्र आई पेगी अॅन फरार हिने शीख धर्म स्वीकारला होता. 2010 च्या दशकाच्या सुरुवातीला तिने शीख धर्म स्वीकारला होता. ती लिओनार्डो डिकॅप्रियो याचे वडील यांची दुसरी बायको आहे.
2. लिओनार्डो डिकॅप्रियो याचे नाव लिओनार्डो का ठेवले याची स्टोरी देखिल अतिशय मजेशीर आहे. त्याची आई जेव्हा प्रेग्नंट होती, तेव्हा ती लिओनार्डो दा विंची यांचे पेन्टिंग पाहायला गेली होती. त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा पोटातील बाळाने किक मारली होती. म्हणून त्यावेळीच त्यांनी निश्चय केला होता की आपल्या मुलाचे नाव देखील आपण लिओनार्डो ठेवायचे. आहे ना मजेशीर?
3. तो लहान असतानाच त्याचे आई वडील विभक्त झाले होते. त्याचे बालपण त्याच्या आईसोबतच व्यतीत झाले. 1998 मध्ये त्याने आपल्या जन्मस्थळी एक कॉम्प्युटर रुम सर्व सुखसोयींनी युक्त तेथील मुलांना तंत्रज्ञान शिकता यावे यासाठी दिली होती.
टायटॅनिक स्टार लिओनार्डो डिकॅप्रियोचे Must Watch पाच सिनेमे
4. 1998 साली त्याला पीपल मॅगझिन्स तर्फे जगातील सर्वात 50 सुंदर व्यक्तींच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.
5. लिओनार्डो डिकॅप्रियो फक्त 19 वर्षांचा होता. त्यावेळी त्याला अकॅडमी अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळाले होते. 1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप’ या सिनेमातील त्याच्या अभिनयासाठी त्याला हे नॉमिनेशन मिळाले होते. सर्वात कमी वयामध्ये नॉमिनेशन मिळालेल्या लोकांच्या यादीत त्याचा नंबर सातवा होता.
6. ब्लड डायमंड या सिनेमाच्या शूटिंगसाठी जेव्हा तो साउथ अफ्रीकेमध्ये गेला होता. तेव्हा तेथील अनाथाश्रमामध्ये एका मुलीला तो भेटला. आणि त्याने तिला दत्तक घेण्याचे ठरवले. तो दर महिन्याला तिच्यासाठी चेक पाठवतो आणि रेग्युलर तिच्याशी फोनवर बोलतो.
7. वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीसाठी त्याने 2010 मध्ये मोठी रक्कम देणगी म्हणून दिली होती. त्याचे विमान उशिरा पोहोचनार होते तरीही तो त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला होता. पर्यावरणाचा समतोल, संरक्षण अश्या बऱ्याच गोष्टींसाठी तो प्रयत्नशील असतो. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नजर फिरवली तर त्याचे पर्यावरण प्रेम स्पष्ट दिसून येईल.
Happy BirthDay Leonardo DiCaprio
महत्त्वाच्या बातम्या
- चारधाम प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, केंद्र आणि स्वयंसेवी संस्थांना मंजुरीसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय सुचवण्याचे निर्देश
- सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची आयएसआयएस आणि बोको हराम बरोबर तुलना; राजकीय क्षेत्रात वादळ, तक्रार दाखल
- देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,091 रुग्ण आढळले, रिकव्हरी रेट 98.25 टक्क्यांवर
- फ्रान्समध्ये कोरोनाची 5वी लाट सुरू, सलग दुसऱ्या दिवशी 10,000 हून अधिक रुग्ण आढळले, सरकारने दिला इशारा
- स्पेसएक्स रॉकेटवरून 4 अंतराळवीर ISS साठी रवाना, भारतीय अमेरिकन राजा चारी करणार ‘क्रू 3’ मिशनचे नेतृत्व