वृत्तसंस्था
जयगड : – छोट्या पडद्यावरच्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील स्वीटू आणि ओमचं प्रेम प्रेक्षकांना भावले. त्यांचा लग्नसोहळा कोकणातील जयगड येथील जय विनायक मंदिर येथे थाटामाटात पार पडला. Finally Om Sweetu’s wedding In Ratnagiri
जयगड येथील प्रसिध्द अश्या जय विनायक मंदिरात ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे शूटींग सुरु आहे. स्वीटूच्या लग्नाला विरोध करणारी मालविका देखील हजर असून तीचा देखील या लग्नाला पाठिंबा आहे हे विशेष. ओम आणि स्वीटूच लग्न होणार का? या पश्नाचे उत्तर पेक्षकांना २९तारखेच्या महाएपीसोडमध्ये मिळणार आह़े
मालविकाने अनेक अडथळे आणल्यानंतरही ओम आणि स्वीटू यांचं होणारं लग्न पाहून प्रेक्षक सुखावले होते. मात्र मालिकेत आलेल्या ट्विस्टने प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आणि मालिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. आता पुन्हा एकदा मालिकेत ओम आणि स्वीटू यांच्यातील अंतर कमी होताना दाखवण्यात आलं आहे. मात्र अचानक आलेल्या या ट्विस्टमुळे पुन्हा या दोघांचे लग्न होताना प्रेक्षकांना दिसणार आहे. मालविका पुन्हा काय गोंधळ घालणार आहे की नाही हे अजूनही कलाकारांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.
- अखेर ओम स्विटूचं लग्न रत्नागिरीत थाटामाटात..
- ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ याचे शूटिंग
- जयगड येथील जय विनायक मंदिरात थाटामाटात
- लग्नाला विरोध करणारी मालविका देखील हजर
- मालविका पुन्हा गोंधळ घालणार का ?
Finally Om Sweetu’s wedding In Ratnagiri
महत्त्वाच्या बातम्या
- चंद्रावर पडणार भारतीयाचे पाय, चांद्रमोहिमेवर भारतीय भोजन नेण्याचीही योजना
- ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका रद्द करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी
- अफ्सा कायदा देशावर काळा डाग, सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करण्याची नागालॅँड सरकारची मागणी
- धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर, आय एम बाबरी लिहिलेले बॅज विद्यार्थ्यांच्या खिशाला लावले
- पवार बनणार काँग्रेस आणि ममता यांच्यातला पूल?, की दोघांनाही देणार राजकीय हूल…??