विशेष प्रतिनिधी
मुबंई : 1980 ते 1990 या काळामध्ये स्वीटी नावाची बार डान्सर मुंबईमध्ये प्रचंड फेमस झाली हाेती. ती टोपाझ नावाच्या डान्सबारमध्ये काम करायची. ती फेमस का झाली? ती फेमस यासाठी झाली होती कारण तिने आपले सेक्स चेंज केले होते. हो, ती आधी पुरुष होती. सेक्स बदलून ती पुरुषाची स्त्री झाली होती. त्यामुळे ती त्या काळात मुंबईमध्ये प्रचंड फेमस झाली होती. आता तिच्या आयुष्यावर दिग्दर्शक, फिल्म मेकर संजय गुप्ता एक सिनेमा बनवणार आहेत. टोपाज असे या सिनेमाचे नाव आहे.
Filmmaker Sanjay Gupta will make a film about the life of famous bar dancer Sweety
संजय गुप्ता यांनी याआधी विस्फोट, काबील, मुंबई सागा यासारखे हटके सिनेमे बनवले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक समित कक्कड करणार आहेत. समित कक्कड यांनी ‘इंदोरी इश्क’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा एमएक्स प्लेअरवर प्रचंड हिट ठरला होता.
टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना संजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, स्वीटीच्या आयुष्यावर सिनेमा आम्ही बनवत आहोत, हे नक्की आहे. स्विटीच्या कहाणीने स्वत: ला एका शानदार स्क्रीनप्लेच्या रूपात सादर केले आहे. मला विश्वास आहे की हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. सध्या सिनेमाचे कास्टिंग आणि इतर कामे सुरू आहेत.
Filmmaker Sanjay Gupta will make a film about the life of famous bar dancer Sweety
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टी सोडण्यासाठी मोदी कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची ऑफर; खासदार भगवंत मान यांचा खळबळजनक दावा!!
- पंचगंगा नदीमध्ये फेस आढळून आला
- शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी सोडला ‘संसद टीव्ही’ शो ‘मेरी कहानी’; राज्यसभेतील निलंबनानंतर तडकाफडकी राजीनामा
- शिक्षकांच्या मोर्चावर लाठी चार्ज : उत्तर प्रदेशमधील ६९००० सहाय्यक शिक्षकांच्या शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या कॅडल मोर्चावर पोलिसांचा लाठी चार्ज