विशेष प्रतिनिधी
मुबंई : ओम जय जगदीश, फिदा, खुशी या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता आणि एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता फरदीन खान पुन्हा चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. प्रिया बापट, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांची प्रमुख भूमिका असणारा ‘विस्फोट’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा एक थ्रीलर सिनेमा आहे. त्यामुळे थ्रीलर सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.
Fardeen Khan’s return to films! Riteish Deshmukh, Priya Bapat will be seen in the movie ‘Visfot’
प्रिया बापटने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या या हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. भूषणकुमार या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत.
हॉटस्टारवरील ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमुळे प्रिया बापटने राष्ट्रीय स्तरावर भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. संपूर्ण भारतातून आता तिला फॅन फॉलोव्हिंग मिळाली आहे. रितेश देशमुखने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलीवूड क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ग्रँड मस्ती, तेरे नाल लव्ह हो गया, बाघी, एक व्हिलन अशा अनेक सिनेमांमधून आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यची झलक वेळोवेळी दाखवली आहेच.
तर फरदीन खान आता बरोबर 11 वर्षांनंतर चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात तो दिसला होता. फरदीन खानच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही एक आनंदाची बातमी आहे.
Fardeen Khan’s return to films! Riteish Deshmukh, Priya Bapat will be seen in the movie ‘Visfot’
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकची ‘सीक्रेट ब्लॅकलिस्ट’ लीक, भारतातील ‘या’ 10 धोकादायक संस्था आणि लोकांची नावेही समाविष्ट
- Cruise Drugs Case : आर्यन खान 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामिनावरील निकाल राखून ठेवला
- बांग्लादेशात दुर्गापूजा मंडपात कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना, अफवांमुळे उसळला हिंसाचार
- नवाब मलिक म्हणाले, हे लोक तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाहीत, NCB ने जावयाच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय गाठले
- बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढीवर पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, कॅप्टन म्हणाले – देश मजबूत होईल, तर चन्नींचे केंद्रावर आरोप