• Download App
    पुष्पा चित्रपटाच्या शोवेळी चाहत्यांनी केली चित्रपटगृहात तोडफोड | Fans vandalize cinema hall during Pushpa movie show

    पुष्पा चित्रपटाच्या शोवेळी चाहत्यांनी केली चित्रपटगृहात तोडफोड

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : नुकताच सलमान खानच्या अंतिम या चित्रपटाच्या एका शो वेळी एका चाहत्यांने चित्रपटगृहामध्ये फटाके फोडण्याची घटना घडली आहे. आता ‘पुष्पा’ हा अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटगृहामध्ये तोडफोडीची घटना घडली आहे.

    Fans vandalize cinema hall during Pushpa movie show

    या चित्रपटातील श्रीवल्ली या कॅरेक्टरच्या एन्ट्रीच्या वेळी चित्रपटगृहातील आवाज कमी झाल्यामुळे एका चाहत्याने प्रोजेक्ट रूमपर्यंत जाऊन तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्याचप्रमाणे चित्रपट पायरसीमुळे देखील चित्रपट निर्मात्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हा चित्रपट तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 18 डिसेंबर रोजी हा चित्रपट मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.


    न्यूयॉर्क टाइम्सने धमाका सिनेमातील अमृताने साकारलेल्या भूमिकेचे केले कौतुक


    कधी आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट बघण्यासाठी चाहते चित्रपटगृह सजवतात तर कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून चित्रपटगृहामध्ये दंगा घालतात. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. मागे शाहरुख खानच्या रईस चित्रपटाच्या वेळी लैला ओ लैला या गाण्याच्यावेळी एका गुजरातमधील चाहत्याने सर्वांसमोर पैसे उधळल्याची घटनादेखील घडली होती.

    Fans vandalize cinema hall during Pushpa movie show

     

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी