विशेष प्रतिनिधी
मुंबई: सस्पेन्स आणि ड्रामा यांनी भरलेल्या ‘एक थी बेगम’ या सीरिजचा पहिला सीझन संपल्यानंतर दुसऱ्या सिझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. या सीरिजच्या दुसर्या सीझनचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सीरिजचे सर्व भाग ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहेत.
Ek thi Begum 2 teaser release, Ashraf is back to revenge her husband
अभिनेत्री अनुजा साठे, अश्रफ भाटकरच्या भूमिकेत परत येणार आणि या वेळी लीला पासवान या नावाने ती सीरीजमध्ये दिसेल. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये अश्रफ भाटकर, ही सपना या नावाने एका बार डान्सरच्या वेषामध्ये तिच्या पतीच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या सर्वांचा बदला घेण्यासाठी योजना आखत जाते. परंतु तिच्या सर्व योजना या निष्फळ ठरतात आणि सीरिजच्या शेवटी तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात येतो. टीजरमध्ये जास्त काही रिव्हिल केलेलं नाही. ३० सप्टेंबरला अशरफ लीला पासवान या नावाने अंडरवर्ल्डमध्ये कशी वावरते आणि ती आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यात यशस्वी होईल का हे पाहायला मिळेल.
सोशल मीडियावर नेटफ्लिक्स बंदीची मागणी, नवी वेब सिरीज ‘नवरस’वर युजर्सची आक्षेप
टीझर पाहिल्यानंतर हे लक्षात येते की, हा सीझन पहिल्या सीझनप्रमाणेच सस्पेन्स, ट्विस्ट, ड्रामा इंटिमसी, इमोशन या सर्वांनी भरलेला असेल. सीरिजचे दिग्दर्शन सचिन दरेकर यांनी केलेले आहे. अनुजा साठे बरोबरच या सीरिजमध्ये चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसत्कर, अंकित मोहन आणि लोकेश गुप्ते हे कलाकारही असतील.
Ek thi Begum 2 teaser release, Ashraf is back to revenge her husband
महत्त्वाच्या बातम्या
- शपथविधीआधी पंजाब काँग्रेसमध्ये नव्या वादाची फोडणी, हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, वाचा सविस्तर…
- पोलिसांनी ताब्यात घेताच रेल्वे स्थानकावरच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरेंचा 19 बंगल्यांचा घोटाळा, जरंडेश्वरची पाहणी करणार, रोखून दाखवा!
- मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 5 मुले बुडाली; 2 जणांना वाचवण्यात यश; तीन बेपत्ता
- Indian Railway ! सुवर्णसंधी ! रेल्वेने सुरू केली विशेष योजना-50 हजार तरूणांना मिळेल प्रशिक्षण;’या’ 4 ट्रेडमध्ये मिळवू शकतात नोकरी; घ्या सविस्तर माहिती…
- West Bengal : तृणमूलमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियोंचा भाजपविरोधात प्रचार करण्यास नकार;ममता बॅनर्जींचा प्रचार करणार नाहीत