• Download App
    डोन्ट लूकअप या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, लियोनार्डो डीकारपीओ आणि जेनिफर लॉरेन्स यांनी दिली प्रलयाची चेतावणी | Don't look up trailer released, Leonardo DiCarpio and Jennifer Lawrence gave apocalyptic warning but no one takes them seriously

    डोन्ट लूकअप या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, लियोनार्डो डीकारपीओ आणि जेनिफर लॉरेन्स यांनी दिली प्रलयाची चेतावणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नेटफ्लिक्सची नवीन मूवी डोन्ट लूक अपचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात लिओनार्डो डीकारपीओ आणि जेनिफर लॉरेन्स यांच्या प्रमुख भूमिका असतील तर मेरिल स्ट्रीप यामध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे.

    Don’t look up trailer released, Leonardo DiCarpio and Jennifer Lawrence gave apocalyptic warning but no one takes them seriously

    या सिनेमाचे कथानक हे दोन अंतराळवीरांभोवती फिरते. या कथानकातील प्रमुख पात्र असलेले दोन अंतराळवीर पृथ्वीला उध्वस्त करणाऱ्या एका धूमकेतूविषयी सर्वांना चेतावणी देत आहेत. परंतु कोणीही त्यांचा दावा गांभीर्याने घेत नाही. या ट्रेलरमध्ये असे दाखवले आहे की लिओनार्दोचे नाव डॉक्टर रेन्डल मिंडी असे असून त्यांची विद्यार्थिनी केट डीबीएसकी म्हणजेच जेनिफर हे दोघे जगाला एका धुमकेतुपासून वाचवण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत. हे दोघे अंतराळवीर ओरलियन म्हणजेच मेरिल स्ट्रिप जिने युनायटेड स्टेट्सच्या प्रेसिडेंटची भूमिका निभावली आहे, तिच्याकडेही जातात व तिला या संकटाबद्दल चेतावणी देतात. आरीआना ग्रँडे हीचीसुद्धा मदत घेतात. ही बातमी इंटरनेटवर तिच्याकडून व्हायरल करण्यासाठी ते तिच्याकडे जातात. परंतु त्या दोघांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.


    अभय देओल आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फत ‘पेप’ हा Guglielmo Papaleo यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित


    जेव्हा सरकार त्यांची चेतावणी गांभीर्याने घेते तेव्हा त्यांचे पूर्ण लक्ष ते जगाला या संकटापासून वाचवण्यासाठी केंद्रित करतात. चित्रपटामध्ये एक प्रसंग असाही येतो की या दोघांनाही FBI कडून अटक केली जाते. त्यानंतर काय होते हे आपल्याला सिनेमामध्येच पाहायला मिळेल. हे दोघे यशस्वी होतील का नाही हे पाहणे खूप मजेशीर ठरेल. या सिनेमाचे दिग्दर्शन अकॅडमी अवॉर्ड विनर एडम मेके यांनी केले आहे. या सिनेमात मार्क रायलंस, रॉन पर्लमन आणि हिमेश पटेल यांच्याही भूमिका आहेत.

    Don’t look up trailer released, Leonardo DiCarpio and Jennifer Lawrence gave apocalyptic warning but no one takes them seriously

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी