Saturday, 10 May 2025
  • Download App
    बॉलिवूड सुपरस्टार दबंग खानच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी होणार इंटरनॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित | Documentary based on the life of Bollywood superstar Dabangg Khan to be screened on International OTT Platform

    बॉलिवूड सुपरस्टार दबंग खानच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी होणार इंटरनॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बॉलीवूडमधील दबंग स्टार सलमान खान एक जगप्रसिद्ध अभिनेता आहे. सलमान खानने आजवर बरेच हिट चित्रपट दिले आहेत. बॅड बॉय म्हणून प्रतिमा असो, त्याचे अफेअर्स असोत, त्याचे सामाजिक कार्य असो, त्याचा भोळा स्वभाव असो, त्याचं हळवं मन असो सलमान खान नेहमीच चर्चेत असतो.

    Documentary based on the life of Bollywood superstar Dabangg Khan to be screened on International OTT Platform

    सलमान खान फिल्म्स द्वारे सलमान खानच्या आयुष्यावर आधारित एक डॉक्युमेंट्री सीरीज बनवण्यात येणार आहे. आणि ही सीरिज इंटरनॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. ‘बियॉण्ड द स्टार’ असे या डॉक्युमेंट्रीचे नाव असणार आहे.


    सलमान खानच्या शो बिग बॉस 15 मध्ये दिसणार रिया चक्रवर्ती !


    सलमान खान एक माणूस म्हणून कसा आहे, आपल्या घरच्यांसोबत तो कसा राहतो, त्याचे मित्र मैत्रिणी कोण आहे, त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या बऱ्याच महत्त्वाच्या घटना, कॉन्ट्रोव्हर्सी हे सर्व या डॉक्युमेंट्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. या डॉक्युमेंटचे अँकरिंग आलिया भट्ट, संजय दत्त, संजय लीला भन्साळी, साजिद नादीआदवाला, सूरज भरतय करणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. करण जोहरचा देखील या डॉक्युमेंट्रीमध्ये सहभाग असणार आहे.

    सलमान खानचा आगामी टायगर 3 हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमा मध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ झळकणार आहे.

    Documentary based on the life of Bollywood superstar Dabangg Khan to be screened on International OTT Platform

     

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी