• Download App
    दीपिकाची रणवीरसाठी स्पेशल हसबंड अॅप्रिसिएशन स्टोरी | Deepika's Special Husband Appreciation Story for Ranveer

    दीपिकाची रणवीरसाठी स्पेशल हसबंड अॅप्रिसिएशन स्टोरी

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेत असते. आपले वेगवेगळे लूक्स, सोशल मीडिया वरील स्टेटस, स्टोरीज, आपले इंटरनॅशनल मूव्हीज मधील तिचे काम या सर्व गोष्टींमुळे ती चर्चेत असते. सोबतच ती चर्चेत असते ती म्हणजे तिचा नवरा रणवीर सिंग याच्यामुळे.

    Deepika’s Special Husband Appreciation Story for Ranveer

    नुकताच तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या नवऱ्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. हसबंड अॅप्रिसिएशन पोस्ट आहे असे ती म्हणते. ह्या पोस्ट मध्ये ती म्हणते की, ‘जर एखादा पुरुष तुम्ही अज्ञानी आहात, असे तुम्हाला जाणवू न देता एखादी गोष्ट शिकवत असेल तर याच्यापेक्षा आकर्षक काहीच नसतं.’ असे लिहित तिने आपल्या नवऱ्याचे कौतुक केले आहे.


    आगामी आयपीएल मध्ये खेळणार दीपिका रणवीरची टीम?


    2018 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि नुकत्याच येणार्या 83 या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. बॉलीवूडमधील एक पॉवर कपल म्हणून या दोघांना पाहिले जाते.

    Deepika’s Special Husband Appreciation Story for Ranveer

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी