विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘बैजू बावरा’ हा चित्रपट गेले अनेक दिवस हिंदी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे; मात्र मानधनाच्या मुद्द्यावरून निर्मात्यांनी दीपिका पदुकोणला या चित्रपटातून वगळल्याचे बोलले जात आहे. Deepika Padukone will not get role in Baiju Bawra film
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे संजय लीला भन्साळीचे आवडते कलाकार आहेत. भन्साळीच्या ‘गोलियों की रासलीला…राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या तीन चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. हे तिन्ही चित्रपट बॉक्स फिसवर यशस्वी ठरले. त्यानंतर आता भन्साळी ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी त्यांना घेणार होते. दीपवीर ही पती-पत्नीची जोडी चित्रपटात दिसणार म्हणून त्यांच्या चाहत्यांमध्येही चित्रपटाबाबत उत्सुकता होती.
सुरुवातीला नायक म्हणून या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर काम करणार होता. त्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव समोर आले होते; मात्र काही दिवसांमध्येच रणवीर सिंगच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडी पुन्हा भन्साळींच्या या चित्रपटासाठी एकत्र येणार होती; मात्र रणवीर सिंगला देण्यात येणाऱ्या मानधनाइतकेच मानधन आपल्याला हवे, या मुद्द्यावरून निर्मात्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे.
Deepika Padukone will not get role in Baiju Bawra film
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगामधील महापुराचेही खापर फोडले मोदी सरकारवर
- काश्मीरियत माझ्या नसानसांत भिनलेली, राहुल गांधी यांचे काश्मीर भेटीत वक्तव्य
- गंगा, यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली, उत्तर प्रदेशात लाखो लोकांच्या मनात धडकी
- सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले