अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोरोना रूग्णांसाठी मदत कार्य हाती घेतले आहे. रूग्णांवर वेळेवर उपचार होण्यासाठी आणि त्यांना कोणता त्रास होऊ नये यासाठी अनेक कलाकार मदत करत आहेत.
प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटाचा सेट हा कोट्यवधी रूपये खर्च करून तयार करण्यात आला आहे. हा सेट रूग्णालयांना दान करण्यात आला आहे. Corona donates ‘Radhe-Shyam’ set for the treatment of patients
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. अशा परिस्थितीत रूग्णांना बेड्स, ऑक्सिजन तसंच औषधं मिळणं कठीण झालं आहे. बेड्सची कमतरता जाणवत असल्याचं लक्षात आल्यावर अभिनेता प्रभासने पुढाकार घेत त्याच्या आगामी सिनेमाचा संपूर्ण सेट कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दान केलाय.
लवकरच प्रभासचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधे श्याम असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची कथा ही एक ७० च्या दशकातील आहे. राधे श्याम चित्रपटामध्ये इटलीमधील ७० च्या दशकातील हॉस्पिटल दाखवण्यात येणार आहे.
या हॉस्पिटच्या सेटमध्ये वापरण्यात आलेले ५० बेड, स्ट्रेचर, पीपीई किट्स, वैद्यकिय साधने, ऑक्सिजन सिलिंडर या सर्व गोष्टी हैद्राबादमधील एका खाजगी रूग्णालयात देण्यात आल्या आहेत.
या चित्रपटाचे शूटिंग पुर्ण झाल्यानंतर या हॉस्पिटलचा सेट जेव्हा हटवण्यात आला तेव्हा तो एका गोदामात ठेवण्यात आला होता. रूग्णालयांमधील वैद्यकिय सुविधांचा तुटवडा पाहता निर्मात्यांनी हा सेट ९ मोठ्या ट्रकमधून हैद्राबादमधील रूग्णालयांना दिला.
अभिनेता प्रभास तसंच निर्मात्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. शिवाय याठिकाणी लागणारी औषधं, ऑक्सिजन, पीपीई किट्स यांसारख्या अनेक वस्तूंची मदत निर्माते आणि प्रभास यांच्याकडून करण्यात आली आहे.
राधे श्याम या चित्रपटाचे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये प्रभास, भाग्यश्री आणि पूजा हेगडे हे कालाकर प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. 30 जुलै रोजी राधे श्याम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Corona donates ‘Radhe-Shyam’ set for the treatment of patients
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक!कोरोना लसीचे २ डोस घेऊनही अभिनेते मोहन जोशींना झाली कोरोनाची लागण
- Coronavirus Updates आनंदाची बातमी : राज्यात प्रथमच रुग्णसंख्या 40 हजाराच्या खाली ; 61 हजार झाले कोरोनामुक्त
- आनंदाची बातमी : ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता पुण्यात ‘कोवॅक्सिन’ लसीचीही निर्मिती !