विशेष प्रतिनिधी
चेन्नई : मोहनलाल हे साऊथ चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव आहे. यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपटांची नोंद आहे. नुकताच त्यांचा दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज झाला होता. आणि हा चित्रपट देखील नेहमीप्रमाणे सुपरडुपर हिट ठरला होता. आता अभिनेते मोहनलाल दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
Barroz: The first look released, superstar Mohanlal will make his directorial debut
‘बारोझ’ हा त्यांचा पहिला चित्रपट असणार आहे जो ते स्वतः दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक त्यांनी आज नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या प्रेक्षकांसाठी आणि चाहत्यांसाठी रिलीज केला आहे.
हा लूक शेअर करत त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.
या चित्रपटामध्ये मोहनलाल मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. हाच चित्रपट 3D मध्ये शूट केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये स्पॅनिश अभिनेता पाज वेगा आणि रॅफेल अमरगो हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये झळकणार आहेत. ही भारतातील पहिली 3D मूव्ही असणार आहे.
Barroz: The first look released, superstar Mohanlal will make his directorial debut
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम किसानचा १० वा हप्ता जारी : पीएम मोदींनी १०.०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले २०,९४६ कोटी रुपये, तुमच्या खात्यात आले की नाही असे तपासा
- UP Elections : निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांची मोठी घोषणा, सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत
- मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, ठाकरे सरकारमधील मंत्री म्हणतात मुख्यमंत्री घेणार निर्णय!
- IMA, IIT दिल्ली आणि जामिया मिलियासह 6000 संस्थांचा FCRA परवाना कालबाह्य, परदेशी देणग्यांचा मार्ग बंद