विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ड्रग केसमध्ये अटक केली आहे. या अटकेनंतर मिडीयामध्ये आर्यन खानची अटक हा विषय एक चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, या केसमध्ये अटक केलेल्या लोकांचे एनसीपी, समीर वानखडे आणि एनजीओ वर्कर्स यांच्याकडून समुपदेशन करण्यात आले आहे.
Aryan Khan promises Sameer Wankhede, will work proudly after his release from jail, will help needy people in the society
या वेळी आर्यन खानने समीर वानखेडे यांना प्रॉमिस केले आहे की, जेलमधून माझी सुटका झाल्यानंतर मी एक चांगला व्यक्ती बनून दाखवेन. समाजातील गरजू लोकांसाठी कामे करेन. त्याचप्रमाणे एकदिवसीय मी तुम्हाला अभिमान वाटेल असे काहीतरी काम करून दाखवेन.
आर्यन खान याच्यासोबत मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, इश्मितसिंग, मोहक जैस्वाल, गोमेद चोप्रा, नुपूर साठीचा, विक्रांतच होकर अशा एकूण 20 लोकांना अटक झाली होती. या सर्व 20 जणांचे एनसीपी आणि एनजीओ वर्कर्स यांच्याकडून समुपदेशन करण्यात आले आहे.
आर्यन खानने बेल मिळण्यासाठी अँप्लिकेशन कोर्टामध्ये दिले होते. पण त्याची बेल अँप्लिकेशन रिजेक्ट करून कोर्टाने त्याला 14 दिवसांची कस्टडी सुनावली आहे. त्यांनंतर त्याला एनसीबी कस्टडी मधून अर्थर रोड वरील जेल मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
Aryan Khan promises Sameer Wankhede, will work proudly after his release from jail, will help needy people in the society
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय रेल्वे मंत्री मागील पाच दिवसापासून मुंबईत पोटनिवडणुकीच्या प्रचार कामासाठी आले आहेत, जशी एअर इंडिया विकली तशी रेल्वेदेखील विकली का?- संजय राऊत
- ‘मी काँग्रेस अध्यक्ष होण्याचा विचार करेन, पण पक्षनेत्यांकडून विचारधारेवर स्पष्टता हवी’ – CWC बैठकीत राहुल गांधींचे प्रतिपादन
- ‘CWCची कमी आणि परिवार बचाओ वर्किंग कमिटीची बैठक जास्त’, भाजप नेते गौरव भाटियांची काँग्रेसवर कडाडून टीका
- केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमूळे कोट्याम मधून 10 जण झाले बेपत्ता