• Download App
    अमिताभ बच्चन यांच्या पान मसाला जाहिराती वरून सुरू झाला नवा वाद! | Amitabh bachchan's new controversy of pan masala advertisement

    अमिताभ बच्चन यांच्या पान मसाला जाहिराती वरून सुरू झाला नवा वाद!

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : बॉलीवूड कलाकार आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचं खूप जुनं नातं आहे. कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकण्यापासून कोणताही बॉलीवूड कलाकार चुकत नाही. याला महानायक अमिताभ बच्चनदेखील अपवाद नाहीत. सध्या अमिताभ बच्चन एका वेगळय़ा वादामध्ये अडकले आहेत.

    Amitabh bachchan’s new controversy of pan masala advertisement

    राजनिवास पान मसाला या ब्रॅण्डचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन सध्या काम करत आहेत. या ब्रँडच्या एका जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन झळकले होते. या गोष्टीवरून नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर इरिगेशन ऑफ टोबॅकोचे अध्यक्ष शेखर साळकर यांनी अमिताभ बच्चन यांना पत्र लिहून अमिताभ बच्चन यांनी या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये काम करु नये. अशी विनंती केली आहे.

    शेखर साळकर यांच्या म्हणण्यानुसार, देशामध्ये जास्तीत जास्त लोक हे फिल्म स्टार्सना फॉलो करतात. यामध्ये सर्वात जास्त संख्या ही तरुण वर्गाची असते. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी या जाहिरातीत काम करणे बंद केले तर उत्तम होईल. याआधी शाहरुख खान, अजय देवगण, रणवीर सिंह, हृतिक रोशन यांनीदेखील पान मसालाच्या ऍडमध्ये काम केले होते. तेव्हा सुद्धा अशीच कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली होती.


    Amitabh Bachchan and family with other Juhu residents appreciated Corona Fighters!


    या सर्व वादावर आपले मत व्यक्त करताना अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये ते लिहितात की, ‘एक घडी खरीद कर हात में क्या बांध ली, समय पिछे ही पड गया.’ या त्यांच्या ट्विटवर एका यूजरने कमेंट करताना म्हटले आहे की, काही पैशांसाठी तुम्ही ही जाहिरात करणे योग्य नाही.

    या कमेंटला उत्तर देताना बिग बी लिहितात की, “मान्यवर, क्षमा प्रार्थी हूं, किसी भी व्यवसाय में यदि किसी का भला हो रहा है, तो ये नहीं सोचना चाहिए कि हम उसके साथ क्यों जुड़ रहे हैं। हां, यदि व्यवसाय हो तो हमें भी अपने व्यवसाय के बारे में सोचना पड़ता है। अब आपको ये लग रहा है कि मुझे ये नहीं करना चाहिए था लेकिन हां, मुझे भी ये करने में धनराशि मिलती है। हमारे उद्योग में जो बहुत से लोग काम कर रहे हैं, जो कर्मचारी हैं उन्हें भी रोजगार मिलता है और धन भी। और मान्यवर, तूतपूंजियों आपके मुंह से शोभा नहीं देता और ना ही हमारे उद्योग के बाकी कलाकारों को शोभित करता है। आदर समेत नमस्कार करता हूं।

    आता ह्या सर्व प्रकरणा नंतर अमिताभ बच्चन काय निर्णय घेतात ह्याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

    Amitabh bachchan’s new controversy of pan masala advertisement

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी