• Download App
    अक्षय कुमारचा सूर्यवंशी सिनेमा कोविड काळानंतर सर्वात जास्त कमाई केलेला चित्रपट | Akshay Kumar's Suryavanshi Cinema is the highest grossing film after covid period

    अक्षय कुमारचा सूर्यवंशी सिनेमा कोविड काळानंतर सर्वात जास्त कमाई केलेला चित्रपट

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, रणवीर सिंग, अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असणारा सूर्यवंशी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जवळपास दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने वीकेण्डला तब्बल 77 कोटींची कमाई केली आहे. रोहित शेट्टी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

    Akshay Kumar’s Suryavanshi Cinema is the highest grossing film after covid period

    मागील बऱ्याच दिवसांपासून सर्व चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत होते. दर दिवाळीमध्ये कोणत्या तरी एका खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित व्हायचा. पण ह्यावेळी बाजी खिलाडी अक्षय कुमारने मारली आहे. अक्षय कुमारचा सूर्यवंशी प्रदर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही बातमी देत बॉलीवूड इंडस्ट्रीला मिळालेल्या दिवाळी गिफ्टबद्दल आनंद व्यक्त केला आहे.


    SURYAWANSHI: या देशात पंतप्रधानांवर प्रेम करणे देखील गुन्हाच ! अक्षय कुमारला देशप्रेम पडतयं महागात; #BoycottSuryawanshi सोशल मीडियावर ट्रेंड


    या चित्रपटाआधी बेलबॉटम, रुही, मुंबई जागा आणि थलाइवी हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या सर्व चित्रपटांमध्ये सूर्यवंशी ह्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर कमाई करण्याचा विक्रम बनवला आहे.

    Akshay Kumar’s Suryavanshi Cinema is the highest grossing film after covid period

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी