विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: सोशल मीडियावर बेयर ग्रिल्स याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने हिंदी भाषेमध्ये एक व्यक्तव्य केले आहे. इनटू द वाइल्ड विथ बेयर ग्रिल्स या शोचा जगभरामध्ये खूप मोठा चाहतावर्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजय देवगन, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांसारखे दिग्गज या प्रसिद्ध शोचे भाग राहिले आहेत. अक्षय कुमार याने नुकतेच एका नव्या सीजनसाठी बेयर ग्रिल्स टीमला जॉईन केले. त्यानंतर बेयरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात बेयरने चक्क हिंदीत वक्तव्य केले आहे. ते पाहून अक्षयलाही आश्चर्य वाटले.
Akshay Kumar shocked and praises Bear Grylls for his Hindi speaking video
बेयर ग्रिल्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये “हिम्मत मत हारो दोस्तो” असे हिंदी मध्ये म्हंटले आहे. या व्हिडिओमध्ये तो अजय देवगन, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्यासोबत दिसत आहे. त्यानी कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, हे परफेक्ट नाही पण मी माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे.
या संदर्भात अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. यामध्ये त्यानी असे म्हटले आहे की, “ये हिंमत ना हारनेवाली भावनाही आपको अद्भुत बनाती है. आपके साथ व्हाईल्ड एडवेंचर पर जाना मेरे लिये एक शानदार पल था.”
सध्या अक्षय त्याच्या नवीन फिल्म सूर्यवंशीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेली ही एक कॉप ड्रामा फिल्म आहे. अक्षय या चित्रपटामध्ये एटीएस पथक चीफ डीसीपी वीर सूर्यवंशी हे पात्र निभावत आहे. या चित्रपटामध्ये कॅटरिना कैफ अक्षयच्या पत्नीचा रोल करणार आहे. अक्षयबरोबरच या चित्रपटात अजय देवगन आणि रणवीर सिंग यांच्याही भूमिका आहेत. दिवाळीत पाच नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
Akshay Kumar shocked and praises Bear Grylls for his Hindi speaking video
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान