विशेष प्रतिनिधी
मुबंई : बॉलीवूडचा चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असणारा शाहिद कपूर याचा नवीन सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. जर्सी असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. आणि काही क्षणांच्या अवधीतच लोकांनी या ट्रेलरला भरभरून प्रेम दिले आहे, असे पहावयास मिळते. कबीर सिंग नंतर शाहिदचा जर्सी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा एका तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत गौतम तिन्नुरी आहेत. जर्सी या चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
After the success of Kabir Singh, the trailer of Shahid Kapoor’s upcoming movie ‘Jersey’ was released
एकेकाळी क्रिकेट मध्ये गोल्डन करिअर असणारा एक व्यक्ती. पण काही कारणाने त्याला क्रिकेट सोडावे लागते. त्याची पत्नी नोकरी करून घरखर्च चालवत असते. दु:ख आणि निराशाच्या गर्तेत गेलेल्या माणसाला आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी खूप धडपड करावी लागते. आणि ह्या व्यक्तीचे कॅरॅक्टर शाहिद कपूरने या सिनेमामध्ये निभावले आहे. आपल्या मुलाला 500 रुपयांची जर्सी घेऊन देण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नसतात. आपल्या मुलांकडे बघून त्याला आयुष्य जगण्याची एक नवीन उमेद मिळते, कारण मिळते. पुन्हा तो क्रिकेटमध्ये असिस्टंट कोच म्हणून जॉइन होतो. असा त्याचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. असे ट्रेलरवरून दिसते आहे.
कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा ‘धमाका’ चित्रपट दाखवण्यात आला IFFI 2021 मध्ये
हा चित्रपट 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूरने या चित्रपटासाठी 35 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.
After the success of Kabir Singh, the trailer of Shahid Kapoor’s upcoming movie ‘Jersey’ was released
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊदच्या संबंधांचे पुरावे’, समीर वानखेडे यांच्या पत्नीच्या चॅट्स मलिकांकडून शेअर, क्रांती रेडकर यांनी दिले स्पष्टीकरण
- टीम इंडियाच्या डाएट प्लॅनवरून वाद, हलाल मीट अनिवार्य करण्यावरून नेटकऱ्यांचा बीसीसीआयवर संताप
- मोठी बातमी : इंधनाचे दर कमी करण्यासाठी भारताची आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून कच्चे तेल सोडण्याची तयारी
- खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी केला २०० रुपयांचा दंड ; जाणून घ्या नेमक काय आहे कारण
- 26 /11 च्या हल्ल्यानंतर यूपीए सरकारच्या प्रतिकारात कमजोरी दिसली; काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांचा हल्लाबोल