वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी छोट्या पडद्यावरील ‘सुपर डान्सर’ या शोतून ती चाहत्यांशी कनेक्ट आहे. फिटनेसमुळेदेखील ती नेहमी चर्चेत असते. अलिकडेच तिला एका जाहिरातीसाठी तब्बल १० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु शिल्पाने ही जाहिरात धुडकावली आहे. Actress Shilpa Shetty regected An offer of Rs 10 crore
ही एका स्लिमिंग पिल्स म्हणजेच वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांची ही जाहिरात होती. मात्र अशा कुठल्याही गोळ्यांची जाहिरात करणार नाही, असानिर्णय शिल्पाने घेतला आहे.
वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होतो. या गोळ्या कायम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतल्या जाव्यात, असा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात. म्हणूनच शिल्पाने ही जाहिरात नाकारली आहे. या निर्णयाबद्दल तिचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या