• Download App
    अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत, 500 कोटी रुपये खर्चून वुमन सुपार हिरो सिनेमा बनवणार , असे पोकळ वचन सुकेशने जॅकलिनला दिले होते | Actress Jacqueline Fernandez in the lead role, Sukesh had promised Jacqueline to make a woman superhero movie at a cost of Rs 500 crore

    अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत, ५०० कोटी रुपये खर्चून वुमन सुपार हिरो सिनेमा बनवणार , असे पोकळ वचन सुकेशने जॅकलिनला दिले होते

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाठग सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात बॉलीवूडमधील अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडकली. तिच्या पाठोपाठ नोरा फतेही देखील ईडी चौकशीच्या जाळ्यात अडकली. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून दिलेल्या होत्या. तसेच तिच्या आईला, बहिणीला, भावालादेखील अनेक पैसे दिलेले होते.

    Actress Jacqueline Fernandez in the lead role, Sukesh had promised Jacqueline to make a woman superhero movie at a cost of Rs 500 crore

    महागडे कानातले, ब्रेसलेट, ब्रँडेड कपडे, महागडा घोडा,।महागडे मांजर, महागड्या गाड्या हे सर्व सुकेशने जॅकीला दिले होते. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कळतेय की, सुकेशने जॅकलिनला आणखी एक वचन दिले होते. ते म्हणजे आपण 500 कोटी फिल्म प्रॉडक्शनसाठी इन्व्हेस्ट करणार आहोत असे त्याने तिला सांगितले होते.


    सुकेश चंद्रशेखर म्हणतो, जॅकलिन खोटे बोलतेय


    वुमन सुपरहिरोच्या सिरिजमध्ये जॅकलीनला मुख्य अभिनेत्री म्हणून घेतले जाईल, असे देखील त्याने सांगितले होते. हे सर्व करण्यासाठी आधी त्याने जॅकलिनचा, बॉलीवूडचा खूप रिसर्च केला होता. आणि हा महा प्रोजेक्ट बनवण्यासाठी हॉलीवूडमधील आर्टिस्ट देखील काम करणार असल्याचे त्याने तिला सांगितले होते.

    या सर्व गोष्टींमुळे जॅकलिनला सुकेशवर विश्वास बसला. 500 कोटी रुपये खर्चून एक वुमन सुपार हिरो सिनेमा बनणार आणि त्यात आपण अभिनेत्री असणार या मोहापायी ती त्याच्या जाळ्यात अडकली असे आता सांगण्यात येतेय.

    Actress Jacqueline Fernandez in the lead role, Sukesh had promised Jacqueline to make a woman superhero movie at a cost of Rs 500 crore

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सर्व दिग्गज एकाच फ्रेममध्ये: अनुपम खेर यांनी शेअर केला अमिताभ, नीनासोबतचा एक अनमोल फोटो

    आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई: केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड

    सोनम कपूरच्या सासरी १.४१ कोटींची रोकड, दागिन्यांची चोरी