विशेष प्रतिनिधी
मुबंई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्स वरील त्याच्या ‘सिरीयस मेन’ ह्या सिनेमासाठी त्याला इंटरनॅशनल इमी अवॉर्डसचे नॉमिनेशन नुकताच मिळाले होते. सेक्रेड गेम्स या सिरीजमधून नवाजुद्दीन सिद्दिकीने ओटीटी प्लॅटफॉर्म काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ओटीटी प्लॅटफॉर्म वर बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि सीरिजमध्ये काम केले आहे. रात अकेली है ल, सीरियस मेन, हरामखोर, फोटोग्राफ या सिनेमांमध्ये तो झळकला होता.
Actor Nawazuddin Siddiqui decided to leave the OTT platform
नुकताच त्याने बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म सोडण्याचा निर्णय आपण घेत आहोत हे जाहीर केले आहे. तर सिद्दिकीने हा निर्णय का घेतला? नवाज सिद्दीकीच्यामते ओटीटी प्लॅटफॉर्म हा फक्त मोठ्या प्रोडक्शन हाऊस साठी पैसे मिळवण्याचा मार्ग बनलेला आहे. चांगला कंटेंट क्रिएट करण्यासाठी निर्मात्यांना बरेच पैसे दिले जातात. कधी कधी सीरिजचा दुसऱ्या सीझनची गरज नसते तरी सिजन येत असतात. तर कधी कधी एखाद्या सिरीज मधून कंटेंट पूर्णपणे हरवलेला असतो.
WATCH : HBD नवाजुद्दीन, डेटवर मुलीसमोर रडू लागला अन् तोच सीन सिनेमात हिट झाला
पुढे नवाज म्हणतो, आणि या सर्व गोष्टींमधून काही प्रॉडक्शन हाऊसेस मात्र श्रीमंत होताना दिसून येत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे थिएटरकडे लोकांचा कल कमी झाला आहे. या आधी 3000 चित्रपट गृहात एखादा सिनेमा रिलीज व्हायचा पण आता लोक तिकडे जात नाहीत. कारण लोकांना खूप सारे ऑप्शन्स आहेत.
Actor Nawazuddin Siddiqui decided to leave the OTT platform
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान