विशेष प्रतिनिधी
मुंबई : चित्रपटातील पात्रे बऱ्याचदा त्यांनी लिहिलेल्या लेखकांचे प्रतिबिंब असतात. काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये हे खरे असल्याचे दिसते. लेखकांनी लिहिलेले मिळेल कॅरेक्टर्स हे बरेचदा आक्रमक आणि मस्क्युलर दाखवले जातात. ट्विटरला याच विषयावर एक ट्विट करण्यात आली जी आता ट्रेण्ड मध्ये आहे. त्यावरून आम्ही आणखीन असे काही चित्रपट शोधून काढले ज्यामध्ये स्त्रियांनी लिहिलेले आणि पुरुषांनी लिहिलेले पुरुषांचे पात्र यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.
A glimpse at male characters written by Female vs male characters written by Men
१: जिंदगी ना मीलेगी दोबारा vs मस्ती : जिंदगी ना मिलेगी दोबारा हे झोया अख्तर आणि रिमा कागती यांनी लिहिेलं तर मस्ती या चित्रपटाची कथा मिलाप झवेरी आणि तुषार हिरानंदानी यांनी लिहिली आहे. जिंदगी ना मिलेगी या चित्रपटात पुरुष पात्र हे खूप फ्रेंडली, सात्विक आणि मजेशीर आहेत. मात्र मस्ती सिनेमामधील ३ पुरुषांचे पात्र हे आपल्या पत्नींचा आदर न करणारे आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, स्त्रियांनी लिहिलेली पुरुष पात्रे त्यांना अपेक्षित असलेले गुण संपन्न अशी लिहिली गेली आहेत. तर लेखकांनी लिहिलेली पात्रे कोणतेही फिल्टर न ठेवता लिहिली गेली आहेत. ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की, सर्व पुरुष मस्ती सिनेमात दाखवलेल्या पात्रांसारखे स्वच्छंदी आहेत. पण त्या त्या पात्राची गरज ओळखून कोनतेही फिल्टर न लावता लिहिले गेले आहेत.
२: कबीर सिंग vs पिकू : कबीर सिंग हे पात्र संदीप रेड्डी यांनी लिहिले आहे, तर पिकूमधील इरफान खानचे पात्र जुही चतुर्वेदी यांचे आहे. एक अल्कोहोलिक, आक्रमक तर दुसरे पात्र अगदी शांत स्वभावाचे आणि दयाळू असे आहे. अपेक्षा आणि वास्तव हा फरक ह्या दोन्ही पात्रा मधून स्पष्ट दिसतो.
३: मनमर्झिया vs बद्रीनाथ की दुल्हनियाँ : मनमर्जीया मधील रॉबी या पात्राच्या आपण प्रेमात पडलो कारण इतका प्रेमळ, एकनिष्ठ, हंड्सम, इंटेन्स प्रेम करणारा प्रेमी खऱ्या आयुष्यात भेटणे महा महा कठीण गोष्ट आहे. ही स्क्रिप्ट जे कानिका धिल्लन यांनी लिहिली आहे. तर वरून धवनचे बद्रीनाथ की दुल्हनिया मधील गर्ल स्टॉकर असणारे पात्र शशांक खैतन यांनी लिहिले आहे. एक गावा कडील प्रेमी जसा असतो तसा ह्या सिनेमात दाखवला आहे.
४: ऑक्टोबर vs Gunday : हे दोन्ही हार्टब्रेक वरील चित्रपट आहेत. ऑक्टोबर चित्रपटातील वरुण धवन चित्रपट आणि गुंडे मधील रणवीर सिंग व अर्जुन कपूर यांच्या पात्रांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. गुंडे अली अब्बास जाफर यांनी लिहिले आहे, तर ऑक्टोबर जुही चतुर्वेदी यांनी लिहिला आहे. वरुण धवन चे ऑक्टोबर मधील पात्र सज्जन, शांत आणि स्थिर आहे. तर गुंडे सिनेमातील पात्रे ही रावडी टाइप आहेत.
MAHARASHTRA LOCKDOWN : फिल्मों के सारे हीरो तेरे आगे है जीरो : सोनू सूद देवदूतच !
५: गौरी शिंदे यांनी लिहिलेले डिअर जिंदगी मधील पात्र vs अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी लिहिलेले देव डी मधील पात्र : Dear जिंदगी मधील शाहरुखचे पात्र हे जीवन जगायला शिकवणारे आहे. देव डी मधील पात्र हे शाहरुखच्या बरोबर विरुद्ध आहे.
६: दिल धडकने दो vs प्यार का पंचनामा : रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी दिल धडकने दो या चित्रपटात मैत्रीची अधिक वास्तविक उदाहरणे लिहिली आहेत. तर प्यार का पंचनामा हा सिनेमा फक्त आणि फक्त त्या सिनेमाच्या स्क्रिप्ट मुळे हिट ठरला होता. प्रत्येक जन स्वताच्या आयुष्याला सिनेमात दाखवण्यात आलेल्या पात्रासोबत कनेक्ट करू शकत होता. पण झोया च्या सिनेमातील हाय क्लास रीच रन्वीर मोजक्या लोकांना भावला असणार.
७: गल्ली बॉय vs Rockstar (संगीतमय चित्रपटातील पात्रे) : गल्ली बॉय रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी लिहिले. रॉकस्टार मधील रणबीरचे पात्र इमतीआज अली यांनी लिहिले आहे. रणबीरचे पात्र हे आक्रमक, ड्रग घेणारे आणि खूपच दर्दभरे दाखवले आहे, तर गल्ली बॉय मधील पात्र हे थोडे जास्त वास्तविक आहे. कलाकाराचा संघर्ष दाखवणारे आहे.
वरील सर्व उदाहरणांवरून अपेक्षा आणि वास्तक ह्यातील एक फरक दिसत असला तरी नेहमीच असे असते असे अजिबात नाही. लेखनाची ही फक्त एक बाजू वरील लेखात मांडली आहे.
A glimpse at male characters written by Female vs male characters written by Men
महत्त्वाच्या बातम्या
- क्रूज ड्रग्स रेव्ह पार्टीतून पकडलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाबा, अमीर फर्निचरवाला यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने का सोडले?; नवाब मलिक यांचा खोचक सवाल
- किंग खानला मोठा दणका : BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती रोखल्या, प्री-बुकिंग असूनही जाहिराती रिलीज केल्या नाहीत
- चिपी विमानतळ उद्घाटन : शेजारी खुर्च्या तरीही ना नमस्कार, ना नजरेला नजर, ठाकरे-राणेंमधील बेबनाव कार्यक्रमातही तसाच
- काँग्रेसचे नेते लखीमपूरच्या मुद्द्यात “अडकले”; अखिलेश यादव मात्र विजय यात्रेवर निघाले