विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाचा ज्वर जसा कमी झाला होता तसे चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्यात आली होती. या काळामध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आणि बऱ्याच दिवसांनी लोकांना चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघण्याची संधी मिळाली होती म्हणून चक्क सूर्यवंशी सारखा पिक्चर देखील हिट ठरला. पण या सर्व स्पर्धेमध्ये एक चित्रपट मात्र अतिशय प्रॉमिसिंग आहे. तो म्हणजे स्पायडर मॅन : नो वे होम. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या 3 दिवसांमध्ये याने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
100 crore earnings in first 3 days! Spider-Man: No Way Home movie record
मार्व्हल मूव्हीज चाहते अख्ख्या जगभर पसरलेले आहेत. नुकताच स्पायडरमॅन हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अतिशय उत्कृष्ट कमाई केली होती. 35 कोटी रुपये या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी कमावले होते. तर आज अखेर या चित्रपटाने 100 कोटी रुपये पहिल्या तीन दिवसांमध्ये कमावले आहेत. सोनी टीव्हीचा हा पहिला चित्रपट आहे ज्याने पहिल्या 3 दिवसांमध्ये 100 कोटी रुपये कमावले आहेत. आणि हा एक रेकॉर्ड केला आहे.
भारतीय २१ वर्षीय कश्यपने ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ सिनेमाच्या टीव्ही कमर्शियल साठी कंपोज केले गाणे
या आधीच्या स्पायडरमॅन मूव्हीज देखील जगप्रसिद्ध आहेत. अॅक्शन, थ्रीलर, सस्पेन्सने भरपूर या चित्रपटाचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत चाहते आहेत.
100 crore earnings in first 3 days! Spider-Man: No Way Home movie record
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती
- मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन
- एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??
- 2020-21 मध्ये पहिल्या 7 महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ