- सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल, तर काँग्रेस नेतृत्वावर टीका टिपण्या टाळा; महाआघाडीतील नेत्यांना इशारा (Yashomati thakur news)
- शरद पवारांचा नामोल्लेख टाळला
वृत्तसंस्था
मुंबई : विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकासआघाडी ला विजय मिळवून एकच दिवस उलटतो ना तोच आघाडीतील अस्वस्थता पुढे आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर केलेल्या टीकेचा प्रतिवाद काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यांनी काँग्रेस नेतृत्वामुळेच हे सरकार अस्तित्वात आल्याची आठवण त्यांनी शरद पवारांचे नाव घेता करून दिली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्याने महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. त्यावरूनच काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात असतानाच काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधीविषयी करण्यात आलेल्या टीकेमुळे काँग्रेसने मौन सोडत महाआघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे. Yashomati thakur news
महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. “आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत.
काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे,” असे म्हणत ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.
Yashomati thakur news
एका मुलाखतीत शरद पवार यांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवारांनी राहुल गांधींच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला होता. “हे गरजेचे नाही की, सगळ्यांचेच विचार स्वीकारले पाहिजेत. मी देशातील नेतृत्वाविषयी भाष्य करू शकतो, इतर देशातील नाही. सीमांचे पालन केले गेले पाहिजेत. कोणत्याही पक्षाचे नेतृत्व यावर अवलंबून असते की, त्यांना पक्षामध्ये कशा पद्धतीने स्वीकारले जात आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे,” असे पवार म्हणाले होते.