• Download App
    अरबांकडे तक्रार केल्यास भारतीयांवर आकाश कोसळेल; केजरीवालांच्या अल्पसंख्य आयोगाच्या अध्यक्षाची धमकीची भाषा! | The Focus India

    अरबांकडे तक्रार केल्यास भारतीयांवर आकाश कोसळेल; केजरीवालांच्या अल्पसंख्य आयोगाच्या अध्यक्षाची धमकीची भाषा!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सोशल मीडियातील भारत विरोधी विषारी प्रचाराला आखाती देशांनी आळा घातला असला तरी भारतातील तथाकथित जबाबदार मुस्लिम नेत्यांनी मात्र असल्याच विषारी प्रचाराला हिंदू विरोधातील हत्यार म्हणून वापरायला सुरवात केली आहे.
    भारतात “इस्लामफोबिया” वेळेत आटोक्यात आणला नाही तर हिंदुत्ववाद्यांवर संकटाचा पहाड कोसळेल, अशी धमकी
    दिल्ली सरकारच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जफरूल इस्लाम खान यांनी दिली आहे.

    वास्तविक पाहता कुवेतने भारत सरकारच्या अधिकृत भूमिकेला पाठिंबा दिला एवढेच नव्हे कोविड १९ विरोधातील भारताच्या लढ्याची प्रशंसाही केली पण इस्लाम खान यांनी कुवेतने भारताला दिलेल्या पाठिंब्याचा अर्थ वेगळा लावला. कुवेत भारतातील मुस्लिमांच्या बाजूने उभे राहिले आहे. एवढेच नाही तर आखाती देशही भारतीय मुस्लिमांच्या बाजूनेच उभे आहेत. भारतीय मुस्लिमांनी इस्लामसाठी केलेल्या त्याग आणि बलिदानाची आखाती देशांना कदर आहे, असे इस्लाम खान यांनी म्हटले आहे.

    एवढेच नव्हे तर इस्लाम खान यांनी इस्लामी वर्चस्ववादी विचारवंत शाह वलिउल्ला देहलवी, अबू हसन नदवी, इक्बाल, आणि भारतातला सध्याचा वाँटेन्ड क्रिमिनल झाकीर नाईक याचाही भारतीय मुस्लिम, अरब आणि मुस्लिम जगातील आदरणीय व्यक्ती म्हणून उल्लेख केला आहे.

    यापुढे जाऊन भारतातील हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिमांचा द्वेष करणे थांबविले नाही तर एक दिवस असा येईल की या हिंदुत्ववाद्यांवर संकटाचा पहाड कोसळेल्याशिवाय राहणार नाही. ही धमकी देऊन इस्लाम खान यांनी हिंंदूंना कत्तलीची धमकी देणाऱ्या औवेसी बंधूंच्या पावलावर पाऊल टाकले आहे.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार