देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना रेल्वेकडून दिलाशाची बातमी आली आहे. १ जूनपासून दररोज दोनशे रेल्वे गाड्या चालविल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना रेल्वेकडून दिलाशाची बातमी आली आहे १ जूनपासून दररोज २०० रेल्वे गाड्या चालविल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरीत मजूर विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. या मंत्र्यांना आणण्यासाठी रेल्वे हाच सर्वाधिक चांगला पर्याय आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती गोयल यांनी ट्विटरवरून दिली आहे. या ट्रेनसाठी फक्त ऑनलाइन बुकींग करता येणार आहे.
पुढच्या दोन दिवसांमध्ये रेल्वेकडून दुप्पट श्रमिक विशेष ट्रेन म्हणजे रोज ४०० ट्रेन चालवल्या जातील. सर्व स्थलांतरीत मजुरांनी आहे त्याच ठिकाणी राहावे. त्यांना पुढच्या काही दिवसांत सुरक्षितपणे त्यांच्या गावी रेल्वेद्वारे सोडण्यात येईल, असेही गोयल यांनी सांगितले आहे.
स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी राज्यांनी रेल्वेला सहकार्य करावं. त्यांची जवळच्या रेल्वे स्टेशनच्या रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करावी. यामुळे मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात सुलभ होईल, असे आवाहन गोयल यांनी केले आहे. रेल्वेकडून आतापर्यंत १६०० अधिक श्रमिक विशेष ट्रेन चालण्यात आल्या आहेत. याद्वारे १० लाखांहून अधिक स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यात आलं आहे. विविध राज्यांमधून या श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात येत आहेत.