पाकिस्तान सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील नागरिकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संसदेने तिबेटच्याच धर्तीवर सिंध आणि बलुचिस्तान स्वतंत्र करण्याचाही प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी मुहाजीर कौमी मुव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
लंडन : पाकिस्तान सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील नागरिकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संसदेने तिबेटच्याच धर्तीवर सिंध आणि बलुचिस्तान स्वतंत्र करण्याचाही प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी मुहाजीर कौमी मुव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी केली आहे.
अमेरिकेच्या संसदेत तिबेटच्या स्वातंत्र्याचा ठराव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हुसेन म्हणाले, अमेरिकेच्या सिनेटरने थोडासावेळ काढून सिंध आणि बलुचिस्तानच्या परिस्थितीकडेही पाहावे. सिंध प्रातांत उर्दू बोलणाऱ्या मुहाजीरांना देशोधडीला लावण्यात आले. ते सगळे भारतातील आपले सर्वस्व सोडून पाकिस्तानात गेले होते. आई-वडील आणि कुटुंबापासून वेगळे करून अनेकांना जेलध्ये टाकण्यात आले आहे. या दोन्ही प्रांतातील किमान ९० टक्के लोकांची बलुचिस्तान आणि सिंधूदेश नावाने वेगळ्या देशाची मागणी आहे.
Pakistan administrative and political vector map with flag
परंतु, गेल्या ७२ वर्षांत पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्थांनी या प्रांतांचा समूळ नाश केला आहे. नरसंहार केला आहे. अपहरण, शोषण केले आहे. त्यामुळे येथील जनता आता दुसऱ्या देशाची मागणी करत आहे.
अल्ताफ हुसेन यांचा जन्म पाकिस्तानातील कराची शहरात झाला. मात्र, भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांना तेथे मुहाजीर म्हणून हिन दर्जाची वागणूक दिली जाते. या विरोधात हुसेन यांनी मुहाजीर कौमी मुव्हमेंट नावाची चळवळ उभी केली. सध्या त्यांनी लंडन येथे राजकीय आश्रय घेतला आहे.