विशेष प्रतिनिधी
नागपूर : ‘साहेब, आमच्याकडे पीपीई किटस नाहीत. मास्क नाहीत. सॅनिटायझर्स नाहीत… तुम्ही मुख्यमंत्री असता तर ही वेळ आमच्यावर आली नसती,’ अशी टिप्पणी एका पोलिसाने केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
फडणवीस हे नागपूरहून कारने मुंबईला चालले असताना वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा येथे ते भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते खंडेराव मुंडे यांच्या आग्रहाखातर काही मिनिटांसाठी थांबले होते. मालेगाव तालुक्यातील अडचणींची विचारपूस करीत होते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी तिथे असलेला एक पोलिस अभावितपणे पुढे आला आणि आपली कैफियत सांगू लागला.’
कामाचा प्रचंड ताण आहे, पण कीट नाही, मास्क नाही आणि सॅनिटायझर नाही… तुम्ही मुख्यमंत्री असता तर ही वेळ आमच्यावर आली नसती…,’ असे तो बोलून गेला. त्याच्याच एका सहकारयाने हा व्हीडीओ चित्रित केला होता. नंतर तो व्हायरल झाला आहे. पण या विधानामुळे आपल्यावर राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई तर करणार नाही ना, या शंकेने त्या पोलिसाची पाचावर धारण बसल्याची चर्चा आहे.
पोलिसच संकटात आतापर्यंत महाराष्ट्रात १२७३ पोलिसांना चीनी व्हायरसची लागण झाली आहे, तर तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे. २९१ पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय पोलिसांना अनेक ठिकाणी दगडफेकीला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्रात जवळपास दगडफेकीच्या १८५ घटना घडलेल्या आहेत.
1273 personnel of Maharashtra Police including 131 officers have contracted #COVID19 so far. Out of the total cases, 291 police personnel have recovered while 11 others succumbed to the infection: Maharashtra Police pic.twitter.com/ca93IWCB1s
— ANI (@ANI) May 18, 2020