विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती १६० रुपयांनी घटल्या आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती अभूतपूर्व घटल्या आहेत. तशाच देशात गँस सिलिंडरच्या किमती ८५० रुपयांपर्यंत पोहोचून ७४४ रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या. त्या आता आणखी कमी झाल्या आहेत. मार्च महिन्यापासूनची ही तिसरी घट आहे. देशात सर्व शहरांमध्ये सिलिंडर आता ५०० ते ६०० रुपयांच्या रेंजमध्ये मिळेल.
प्रत्येक शहरांमध्ये याच्या किमती थोड्याफार प्रमाणावर वेगवेगळ्या राहतील. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे आणि जून महिन्यांत प्रत्येकी एक सिलिंडर मोफत मिळण्याची योजना चालू आहेच. या पार्श्वभूमीवर त्या योजनेचे लाभार्थी नसणाऱ्यांनाही सिलिंडरच्या किमती घटल्याचा दिलासा मिळणार आहे. दिल्लीत आता १४.५ किलोचा सिलिंडर ५८१.५० रुपयांना तर मुंबईत ५७९ रुपयांना मिळेल.