पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांकडेच साखर कारखान्यांना मदत द्या म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साकडे घालत आहेत. मात्र, उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांना नकार दिला असून साखर कारखान्यांना मदत केल्यास टीका होईल, असे म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांकडेच साखर कारखान्यांना मदत द्या, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साकडे घालत आहेत. मात्र, उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांना नकार दिला असून साखर कारखान्यांना मदत केल्यास टीका होईल, असे म्हटले आहे.
साखर कारखान्यांना त्वरित मदत जाहीर करून साखर कारखाने जगवावे, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी याला स्पष्ट नकार दिला आहे. साखर कारखान्यांना त्वरित मदत केली नाही तर त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळे त्यांना मदत जाहीर करा, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगोदरच दोन साखर कारखान्यांना मदत केली आहे. आता आणखी साखर कारखान्यांना मदत जाहीर केली तर त्याचा चुकीचा संदेश जनतेत जाईल. त्यामुळे थोडा वेळ थांबून नंतर याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली. परंतु ती पवार यांना पटली नाही, असेही सूत्रांनी सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर केलेले नाही. यामुळे कामगार, मजुर आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवरही शरद पवार सातत्याने साखर कारखान्यांना मदतीचे तुणतुणे वाजवित आहेत. साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत मिळालेल्या मदतीच्या पॅकेजचे काय केले याची सर्वांनाच माहिती आहे.
भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील महाराष्ट्रातील साखर कारखानदारी ओळखली जाते. त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी साखर कारखान्यांना मदत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.