• Download App
    संध्याकाळच्या अजानला विरोध करणारे ट्विट करणार्या भारतीयावर कॅनडात बहिष्कार | The Focus India

    संध्याकाळच्या अजानला विरोध करणारे ट्विट करणार्या भारतीयावर कॅनडात बहिष्कार

    धर्मनिरपेक्षतेच्य नावाखाली धार्मिक प्रथांना परवानगी देऊ नका अशी मागणी संपूर्ण जगभरात होत आहे. सायंकाळच्या नमाजासाठी मशीदींवरून दिल्या जाणार्या अजानची गरज काय असा प्रश्नही विचारला जातो. मात्र, कॅनडामध्ये हाच प्रश्न विचारणार्या एका भारतीयाला सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.


    वृत्तसंस्था

    टोरँटो : धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धार्मिक प्रथांना परवानगी देऊ नका अशी मागणी संपूर्ण जगभरात होत आहे. सायंकाळच्या नमाजासाठी मशीदींवरून दिल्या जाणार्या अजानची गरज काय असा प्रश्नही विचारला जातो. मात्र, कॅनडामध्ये हाच प्रश्न विचारणार्या एका भारतीयाला सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.

    भारतामध्ये इस्लामोफोबिया वाढतोय असा आरोप येथील काही तथाकथित सेक्युलरांकडून केला जातो. त्यामुळे जगभरात भारतीयांकडे याच नजरेने पाहिले जाऊ लागले आहे. कॅनडातील ऑन्टॅरिओ या शहराचे महापौर पॅट्रिक ब्राऊन्स यांनी मुस्लिम धर्मियांना सायंकाळच्या अजानसाठी परवानगी दिली आहे. यासंदर्भातील ट्विटरद्वारे माहिती देताना त्यांनी म्हटले होते की, १९८४ मध्येच कायदा करून चर्चमधील घंटानादाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता यामध्ये सर्व धर्मियांचा समावेश करण्याची गरज आहे. आम्ही सर्व धर्मियांच्या श्रध्दांचा आदर करत असल्याने मुस्लिम समाज सायंकाळच्या वेळच्या नमाजासाठी अजान देऊ शकतो.

    त्यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रवी हुडा या भारतीय बांधकाम व्यावसायिकाने एक ट्विट केले.
    त्यात त्यांनी या निर्णयाला विरोध केला. ते म्हणतात, आता पुढे काय, कुर्बानीच्या नावाखाली कत्तलीसाठी नेल्या जाणार्या उंट आणि बकर्यांसाठी वेगळे रस्ते ठेवणार का? सर्व महिलांना पायापासून डोक्यापर्यंत बुरखा बंधनकारक करण्यासाठी कायदा करणार का? केवळ काही मते मिळण्यासाठी हे लांगूलचालन करणार का?

    हे ट्विट केल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जयजयकार करत भारताला हिणवणार्या कॅनडात हुडा यांच्या बहिष्काराचा लाट आली. ज्या बांधकाम कंपनीसाठी ते सेवा पुरवायचे तिने त्यांच्यासोबतचा करार रद्द करून टाकला. त्यांच्या मुलांच्या शाळेतील शालेय समितीतून त्यांना काढून टाकण्यात आले. हुडा यांनी हे ट्विट नंतर डिलीट केले. मात्र, तरीही त्यांच्यावर बहिष्काराची मोहीम सुरूच आहे.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार