• Download App
    संजय 'रडत'राऊत...शब्दांचे बुडबुडे काढू नका; मनसेची सडकून टीका आणि इशाराही | The Focus India

    संजय ‘रडत’राऊत…शब्दांचे बुडबुडे काढू नका; मनसेची सडकून टीका आणि इशाराही

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महसूलवाढीसाठी वाईनशॉप उघडा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेवर सामनामध्ये अग्रलेख लिहून टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मनसेचे कार्यकर्ते तुटून पडले आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तर ‘बोलबच्चनचा हॅगओव्हर!’ या मथळ्याने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.

    यात त्यांनी ज्येष्ठ हिंदी कवी हरीवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या काव्यसंग्रहातील ‘किस पथ से जाऊँ असमंजस हैं भोलाभाला’ या काव्यपंक्ती देत राऊत यांना असमंजस ठरवले आहे. घरी रहा, सुरक्षित रहा, असा खास मनसेस्टाईल इशाराही राऊत यांना देण्यात आला आहे.

    खोपकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, खूप दिवस झाले, हल्ली कुणीच विचारत नाही मला, अशी राऊत यांची अवस्था आहे. त्यामुळे ‘मधुशाला’मधील ही ओळ खास बोलबच्चन राऊतसाठी आहे . नागू सयाजी वाडीत बसून शब्दांचे बुडबुडे काढणारे संजय राऊत हे सध्या आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही या भावनेने पछाडलेले दिसतात.

    अन्यथा राज ठाकरेंनी केलेली सूचना त्यांच्या कार्यकारी टाळक्यात शिरली असती. वेळ काय आणि यांचं चाललंय काय? डाईन, वाईन वगैरे शब्दांचे खेळ करत लॉकडाऊनमध्ये वेळ बरा जाण्यापलीकडे फार काही निष्पन्न होणार नाही.

    राज ठाकरेंनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना राज ठाकरे यांनी केली,

    हे या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही. त्यामुळेच राज ठाकरेंच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा. आणखी एक, तुमचे संकटमोचक अजित पवारांनीही हीच मागणी करणारे पत्र देशाच्या प्रधानमंत्र्यांना लिहीले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही असेच विधान काही दिवसांपूर्वी केले होते.

    तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्याची हिंमत या बोरूबहाद्दराला झाली नाही, की मालकांची भीती वाटली? बोला रडत राऊत बोला, असा टोला खोपकर यांनी लगावला आहे.

    नागू सयाजी वाडीतल्या बोरूबहाद्दरांची ह्यफ्रायडे नाईटह्ण जोरदार रंगली असावी, आणि त्याच हॅगओव्हरमध्ये राज यांच्या पत्रातले सविस्तर मुद्दे बुडाले. जे राज ठाकरेंना सुचलं ते आपल्याला आधी का सुचलं नाही, या दु:खाच्या बेहोषीत ‘डाईन, वाईन’ वगैरे शब्दांचे खेळ कागदावर सांडले? राऊत यांचा उल्लेख ‘शॅडो संपादक‘ असा करत ‘घरी रहा, सुरक्षित रहा, तब्येतीत रहा’ असा सल्लाही खोपकर यांनी दिला आहे.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार