चीनी व्हायरसच्या संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नेहमीच्या हिरिरीने समाजात काम करु लागले आहेत. जात, धर्म, पंथ, प्रदेश, भाषा असा कोणताही भेद न ठेवता संघाचे स्वयंसेवक देशभरात अन्नवाटप, स्वच्छता, वाहतुकीसाठी मदत अशा मदतकार्यात व्यस्त आहेत. हैद्राबादमधल्या मुस्लिम वस्त्यांमधले संघ स्वयंसेवकांचे मदततकार्य पाहून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर निशब्द झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : चीनी व्हायरसच्या संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून अतुलनिय कार्याचे उदाहरण मिळत आहे. देशभरात संघाचे कार्यकर्ते काम करत आहेत. हैद्राबादमध्ये संघ कार्यकर्ते मुस्लिम वस्त्यांमधून अन्नाची पाकीटे वाटताना पाहून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर निशब्द झाले आहेत.
एका व्यक्तीने हैद्राबादमधील संघ कार्यकर्ते मुस्लिम बांधवांना मदत करत असल्याचा एक व्हिडीओ जावेद अख्तर यांना ट्विट केला. अख्तर यांनी हा व्हिडीओ कोणतीही कॅप्शन न टाकता रिट्विट केला आहे.
संपूर्ण देशातच संघ कार्यकर्ते चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. अडचणीत असलेल्यांना अन्न पुरविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, औषधे आदी गोष्टींचे वाटप करत आहेत.
संघाने आपल्या ७० हजार शाखा आणि त्याच्याशी सहयोगी संस्थांना या कामासाठी आवाहन केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी स्वयंसेवकांना स्थानिक प्रशासनासोबत काम करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सर्व देशातील संघ स्वयंसेवक प्रशासनास मदतीसाठी उतरले आहेत