• Download App
    संकटात खालच्या पातळीवरील राजकारण कशाला?; रायबरेलीच्या कांग्रेस आमदाराने प्रियांका वाड्रांना बसेसवरून सुनावले | The Focus India

    संकटात खालच्या पातळीवरील राजकारण कशाला?; रायबरेलीच्या कांग्रेस आमदाराने प्रियांका वाड्रांना बसेसवरून सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संकटाच्या वेळा एवढ्या खालच्या दर्जाचे राजकारण करण्याची काहीही गरज नव्हती. एक हजारापेक्षा जास्त बसेसच्या यादीमध्ये अर्ध्याहून अधिक वाहने तर निव्वळ भंगारमध्ये देण्याच्या लायकीचे होते, अशा शब्दात रायबरेली येथील काँग्रेस आमदार आदिती सिंग यांनी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी – वाड्रा यांना टोला लगावला आहे.

    आमदार आदिती सिंग यांनी त्याविषयी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे, संकटाच्या वेळी कालच्या पातळीवरचे राजकारण करण्याची काय आवश्यकता होती. एक हजार बसगाड्यांची यादी पाठविण्यात आली, मात्र त्यापैकी २९७ बस भंगारमध्ये देण्याच्या स्थितीत होते. त्याचप्रमाणे ९८ ऑटोरिक्षा आणि रुग्णवाहिकेसारख्या वाहनांचा समावेश यादीमध्ये करण्यात आला होता. तसेच ६८ वाहनांची तर कागदपत्रेही नव्हती. हा कोणत्या प्रकारचा क्रूर विनोद आहे ?. जर बस उपलब्ध होत्या तर त्यांचा वापर राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रासाठी का केला नाही.

    सिंग पुढे म्हणतात, कोटामध्ये उत्तर प्रदेशातील हजारो विद्यार्थी अडकून पडले होते, तेव्हा या तथाकथित बस कुठे होत्या, तेव्हा विद्यार्थ्यांना घरी सोडणे तर दूर पण राज्याच्या सीमेपर्यंतही सोडणे काँग्रेस सरकारला जमले नव्हते. तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका रात्रीत बस पाठवल्या आणि विद्यार्थ्यांना परत आणले. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीही त्याचे कौतुक केले होते.

    आमदार आदिती सिंग यांच्या प्रियांका गांधी – वाड्रा यांच्यावरील टीकेस विशेष महत्व आहे. कारण प्रियांकांकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आणखी २ वर्षांनी म्हणजे २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे कोरोनाची संधी साधत स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाचा राजकीय फायदा घेण्याता प्रयत्न काँग्रेस करीत आहे. मात्र, स्वपक्षाच्याच आमदाराने टिका केल्याने प्रियांका यांच्या राजकीय प्रभावाविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आहे.

    टाळेबंदीमुळे दिल्लीतच अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी बसेसची सोय करावी, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी – वाड्रा यांनी उ. प्र. राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर प्रियांका यांनी मजुरांना स्वगृही घेऊन जाण्यासाठी काँग्रेस १ हजार बसेसची व्यवस्था करणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर उ. प्र. प्रशासनाने काँग्रेसकडे त्या १ हजार बसेसच्या नोंदणी क्रमांकांची मागणी केली. काँग्रेसतर्फे काही बसेसचे नोंदणी क्रमांक राज्य सरकारकडे सोपविण्यात आले असता त्यापैकी बरेच नोंदणी क्रमांक हे दुचाकी गाडी, रिक्षा आणि सामानाची ने – आण करणाऱ्या वाहनांचे असल्याचे समोर आले होते. त्यावरून प्रियांकांनी लालू यादव यांच्याकडून प्रेरणा घेऊन बस घोटाळा केल्याची बोचरी टिका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्यावरून प्रियांका गांधी – वाड्रा यांच्यावर केली होती.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार