देशभरातून लाखो स्थलांतरीत कामगार-मजूर श्रमिक रेल्वेच्या मदतीने आपापल्या घरी परतत आहेत. अत्यंत तणावात प्रवास करीत असलेल्या या मजुरांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी भारतीय रेल्वेने ऑपरेशन खुशी हा उपक्रम सुरू केला आहे. या मुलांना विविध भेटवस्तू दिल्या जाणार आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरातून लाखो स्थलांतरीत कामगार-मजूर श्रमिक रेल्वेच्या मदतीने आपापल्या घरी परतत आहेत. अत्यंत तणावात प्रवास करीत असलेल्या या मजुरांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी भारतीय रेल्वेने ऑपरेशन खुशी हा उपक्रम सुरू केला आहे. या मुलांना विविध भेटवस्तू दिल्या जाणार आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली.
रेल्वेमधून जाणाऱ्या मजुरांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी पियुष गोयल दिवस-रात्री एक करत आहेत. मात्र, या मजुरांना संकटाच्या काळात मुलांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे रेल्वेतर्फे ऑपरेशन खुशी उपक्रम सुरू केल्याचे गोयल यांनी सांगितले.
दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात याची सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये मजुरांना आणि त्यांच्या मुलांना पाच हजार चप्पल, चन्नपट्टण येथील कारागिरांनी बनविलेली खेळणी, चित्रकलेची वही आणि रंगीत पेन्सील दिल्या जात आहेत. मुलांना चॉकलेटही वाटले जात आहेत. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जात आहे.