भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्याची सवय लागलेल्या पाकिस्तान अयोध्येतील राममंदिर उभारणीवरूनही बरळत आहे. देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे. मात्र, संतांसह मुस्लिम समाजातील नेत्यांनीही पाकिस्तानचा निषेध केला आहे.
वृत्तसंस्था
अयोध्या: भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्याची सवय लागलेल्या पाकिस्तान अयोध्येतील राममंदिर उभारणीवरूनही बरळत आहे. देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे. मात्र, संतांसह मुस्लिम समाजातील नेत्यांनीही पाकिस्तानचा निषेध केला आहे.
पाकिस्तानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आले होते. एकीकडे जग करोना व्हायरसच्या संकटाशी सामना करत आहे, तर दुसरीकडे भाजप आणि आरएसएस त्यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यात व्यस्त आहे. बाबरी मशिदीच्या जागेवर एका मंदिराची निर्मिती या दिशेने टाकलेलं आणखी एक पाऊल आहे. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचे नागरिक या निर्णयाचा निषेध करतात, असे असं ट्वीट करण्यात आले होते.
यावरून संत समाजाने संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, अशी मागणी सरकारकडे केली आहे. देशातील मुस्लीम समाजाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. अयोध्येतच राम मंदिर व्हावे अशी त्यांचीही इच्छा आहे, असे संतांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले. अन्यथा आम्ही पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही राम मंदिर बांधू, असा इशारा देण्यात आला आहे.
बाबरी मशीद खटल्याचे पक्षकार इकबाल अंसारी यांनीही पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये. भारताच्या गोष्टींवर आक्षेप घेणारा पाकिस्तान कोण आहे? पाकिस्तानने आजपर्यंत कोणतंही चांगलं काम केलं नाही आणि आता करणार आहे का? असा सवाल त्यांनी केला.
भारतानेही पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना म्हटले आहे की, भारत हा असा देश आहे की येथे कायद्यानुसार शासन काम करते. सगळ्या धर्मांना समान अधिकार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेळ काढून आमची घटना वाचावी. मग त्यांना आमच्यातील आणि त्यांच्यातील फरक समजेल. पाकिस्तानला अल्पसंख्यांकांचा उल्लेख करायला लाज वाटली पाहिजे.