रामजन्मभूमी परिसरात भव्य राममंदिर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी या परिसरात सपाटीकरणाचे काम सुरू असताना मूर्त्या आणि मंदिराचे अवशेष सापडले आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला जिंकल्यानंतर हे पुरावे सापडल्याने ‘अयोध्या रामलल्ला की ही’ यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
वृत्तसंस्था
अयोध्या : रामजन्मभूमी परिसरात भव्य राममंदिर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी या परिसरात सपाटीकरणाचे काम सुरू असताना मूर्त्या आणि मंदिराचे अवशेष सापडले आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला जिंकल्यानंतर हे पुरावे सापडले आहेत.
रामजन्मभूमी परिसरात जुन्या गर्भगृहाच्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने ११ मे पासून हे काम सुरू आहे. चीनी व्हायरसच्या संकटामुळे या कामात काही अडथळे आले आहेत. मात्र आता हळूहळू हे काम सुरू झाले आहे.
ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की योजनाबध्दरितीने हे काम पूर्ण करण्यात येईल. काही मूर्त्यांसोबत याठिकाणी मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. त्याचबरोबर पुष्प, कलश, वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती याठिकाणी मिळाल्या आहेत. त्याचबरोबर लाल रंगाच्या संगमरवरातील आठ खांब, पाच फूट आकाराचे शिवलिंग या वस्तूही या ठिकाणी सापडल्या आहेत.
अयोध्येतल्या राजमन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना वादग्रस्त जागा रामलल्लालाच दिली होती. कारण या खटल्यात श्री रामचंद्र यांनाच पक्षकार करण्यात आले होते. अयोध्येतच रामलल्लाचा जन्म हे वादातीत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मशीद रिकाम्या जागेवर बांधण्यात आलेली नाही. हा निकाल देताना न्यायालयाने पुरातत्व विभागाचा अहवाल, प्रवास वर्णनकारांनी केलेलं वर्णन आणि इतर पुराव्यांआधारे महत्त्वाचे उल्लेख आणि निरीक्षणे यांचा आधार घेतला होता. या परिसरात सापडलेल्या अवशेषांमुळे न्यायालयाच्या या निर्णयाला आणखी बळ मिळाले आहे.