परप्रांतीय गेल्यामुळे महाराष्ट्रातील कारखाने उद्योगधंदे बंद होऊ नये, यासाठी राज्यातील तरुण तरुणींना या संधीचा फायदा घेऊ द्या. त्यांच्यापर्यंत याबाबत माहिती पोहोचवा,असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. बाहेर गेलेल्या परप्रांतीयांना परत येताना तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नका. परत आल्यावर राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ते वेळ आहे, नंतर ते करता येणार नाही, असेही राज यांनी यावेळी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : परप्रांतीय गेल्यामुळे महाराष्ट्रातील कारखाने उद्योगधंदे बंद होऊ नये, यासाठी राज्यातील तरुण तरुणींना या संधीचा फायदा घेऊ द्या. त्यांच्यापर्यंत याबाबत माहिती पोहोचवा,असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. बाहेर गेलेल्या परप्रांतीयांना परत येताना तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नका. परत आल्यावर राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ते वेळ आहे, नंतर ते करता येणार नाही, असेही राज यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीनंतर राज ठाकरे बोलत होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाला अनेक प्रकारच्या सूचना केल्याची माहिती दिली.
राज म्हणाले की, ‘ज्या पद्धतीने परप्रांतीय महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील. त्यावेळी त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. आपल्याकडे अनेकदा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी त्यांना रोजगाराबाबत माहिती नसते. त्यामुळे जर रोजगार उपलब्ध असले तर ते या मुला-मुलींना कळवावे. भाजी विकण्यापासून इतर अनेक ठिकाणचे लोक बाहेर गेलेले आहे. ती संधी महाराष्ट्र शासनाकडे आहे, ती संधी घालवू नये.
‘लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला, त्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने कोरोना जाणार नाही. लस येईपर्यंत कोरोना जाऊ शकत नाही, असेही राज यांनी सांगितले.
‘गेले दीड महिन्यांपासून काम करुन पोलिस थकले आहेत, तेही प्रचंड तणावाखालून गेले आहेत. काही ठिकाणी पोलिसांना गृहीत धरले जात आहे. अशा ठिकाणी एसआरपीएफ तैनात करावे. त्यामुळे दरारा निर्माण होईल. जेणेकरुन लोक बाहेर येणार नाहीत. तसेच, सरकारी कर्मचारी, पोलिस ते सफाई कामगार अशा अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घ्या. सफाई कामगार आजारी पडत आहेत, त्यांनी हात वर केले, तर शहरांची अवस्था काय होईल? त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या, असे आवाहन त्यांनी केले.
‘रमझानची वेळ सुरु आहे. अनेक ठिकाणी गर्दी होते. लोक बाहेर पडतात. अनेक सण घरात राहून साजरे केले. त्यामुळे मुस्लिम समाजानेही त्याचा विचार करावा. जर विचार होत नसेल तर या ठिकाणी अधिक फोर्स लावणे गरजेचे आहे. जेणेकरुन या गोष्टी बंद होतील. स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना घरी जाण्यासाठी किंवा जे लोक हॉस्टेलमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काही व्यवस्था करता येईल ती करावी. शाळा कशाप्रकारे सुरु करणार. ई लर्निंग वगैरे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. शहरातही अनेक ठिकाणी अशक्य आहे. ती बाब पालकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे,’ अशा सूचना राज ठाकरेंनी सरकारला दिल्या.