• Download App
    रस्त्यावर मोकाट फिरणार्‍याला हटकले म्हणून पिंपरीत पोलिसांना मारहाण | The Focus India

    रस्त्यावर मोकाट फिरणार्‍याला हटकले म्हणून पिंपरीत पोलिसांना मारहाण

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : विनाकारण रस्त्यावर का फिरतो, अशी विचारणा केली म्हणून मशिदीबाहेरच्या एका तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

    या बद्दल तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी येथे सोमवारी (दि. २७) सायंकाळी ही घटना घडली. युनूस गुलाब अवतरणार (वय ५०), मतीन युनूस अवतरणार (वय २८), मोईन युनूस अवतरणार (वय २४, सर्व काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शंकर विश्वंभर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कळकुटे हे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने जमावबंदी व संचारबंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी काळेवाडी येथे विनाकारण रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे कळकुटे यांनी त्यांना हटकले. या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला.

    आरोपी युनूस अत्तार याने व त्याच्या दोन्ही मुलांनी कळकुटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील काठी हिसकावण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार