आपल्या कष्टाने महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने छळ केला. लॉकडाऊनमधील संकटाच्या काळात धोका दिला. बेहाल मजुरांना सोडून दिलं आणि त्यांना रस्त्यावरून गावी चालत जाण्यास बाध्य केलं. या अमानवीय व्यवहारासाठी मानवता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कधीच माफ करणार नाही, असा संताप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : आपल्या कष्टाने महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने छळ केला. लॉकडाऊनमधील संकटाच्या काळात धोका दिला. बेहाल मजुरांना सोडून दिलं आणि त्यांना रस्त्यावरून गावी चालत जाण्यास बाध्य केलं. या अमानवीय व्यवहारासाठी मानवता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कधीच माफ करणार नाही, असा संताप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
स्थलांतरीत मजुरांच्या हालअपेष्टांच्या कहाण्या ऐकून संतप्त झालेल्या योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून ट्विटरद्वारे महाराष्ट्र सरकारविरुध्दचा संताप व्यक्त करण्यात आला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी सामना या वृत्तपत्रात, परप्रांतीय कामगारांना भोगाव्या लागणाऱ्या त्रासावरुन उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली होती. योगी आदित्यनाथ यांची तुलना हिटलरशी केली होती. शिवसेनेच्या या टिकेला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, संजय राऊतजी, उपाशीपोटी असलेलं मूल शेवटी आपल्या आईलाच शोधत फिरत असते. पण महाराष्ट्र सरकारने ‘सार्वत्र आई’ बनूनही त्यांना आश्रय दिला असता तर महाराष्ट्राची जडणघडण करण्यासाठी झटणाऱ्या मजुरांना राज्यात परतावे लागले नसते.
उत्तर प्रदेशात येणाऱ्या सर्व स्थलांतरीत बंधु-भगिनींचे खुल्या दिलाने स्वागत आहेत. त्यांना राज्यात रोजगारही उपलब्ध करून दिला जाईल. आपल्या गावी पोहोचत असलेल्या सर्व बंधु-भगिनींची राज्य सरकारकडून पुरेपूर देखभाल केली जातेय.
आपली कर्मभूमी सोडण्यास बाध्य केल्यानंतर त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करून नाटक करू नका. राज्य सकारकडून आपली पूर्ण काळजी घेतील जाईल, याचा सर्व स्थलांतरीत मजुरांना विश्वास आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने याची चिंता करू नये, असे ट्विटमध्ये नमुद करण्यात आलंय.