चीनी व्हायरसच्या संकटामुळे सर्व राज्यांनी आपल्या प्रवासी मजुरांची जबाबदारी नाकारली. अत्यंत वाईट अवस्थेत त्यांना आपल्या गावाला परतावे लागले. उत्तर प्रदेशातील मजुरांची संख्या यामध्ये मोठी आहे. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या मजुरांना दिलासा दिला असून रोजगाराची भेट देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांना कोणाच्याही दयेवर नव्हे तर आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळणार आहे.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : चीनी व्हायरसच्या संकटामुळे सर्व राज्यांनी आपल्या प्रवासी मजुरांची जबाबदारी नाकारली. अत्यंत वाईट अवस्थेत त्यांना आपल्या गावाला परतावे लागले. उत्तर प्रदेशातील मजुरांची संख्या यामध्ये मोठी आहे. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या मजुरांना दिलासा दिला असून रोजगाराची भेट देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांना कोणाच्याही दयेवर नव्हे तर आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळणार आहे.
चीनी व्हायरसच्या संकटामुळे उत्तर प्रदेशात सर्वाधिक मजूर परतले आहेत. पश्चिम बंगालसारखी अनेक राज्ये या मजुरांना सांभाळायचे कसे म्हणून परत राज्यात आणण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून आपल्या राज्यातील मजुरांसाठी रोजगाराच्या संधी तयार केल्या आहेत. यातून उत्तर प्रदेशाचा मेक ओव्हर करण्याची त्यांची योजना असून संकटात संधी शोधण्याचा प्रयत्न आहे.
परततलेल्या मजुरांना राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर काम मिळणार आहेच. पण त्याचबरोबर रेडीमेट गारमेंट, अन्न प्रक्रिया, फूलशेती आणि त्यातून प्रक्रिया उद्यागे आदींमध्ये या मजुरांना काम दिले जाणार आहे.
योगी सरकारने तब्बल २० लाख श्रमिकांना काम देण्याची योजना तयार केली आहे. यामध्ये मजुरांना त्यांच्या आवडीप्रमाणे आणि कौशल्याप्रमाणे काम दिले जाणार आहे. या श्रमिकांच्या कौशल्याचा योग्य वापर व्हावा यासाठी रॉ मटेरिअल बॅंक तयार केली जाणार आहे. यातून तातडीने कर्जे उपलब्ध होऊन दिली जाणार आहेत. त्याचबरोबर उत्पादनाचा विकास आणि मार्केटिंगची व्यवस्था केली असून त्यांच्या उत्पादननांना चांगला भाव मिळणार आहे.
परतलेल्या मजुरांना काही दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. मात्र, १४ दिवसांचा हा क्वारंटाईनचा काळ संपल्यावर तातडीने काम दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना कोणाच्या दयेवर जगावे लागणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. या मजुरांना पूर्णपणे आत्मसन्मान कायम ठेऊन काम करता येईल, असे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत ८ लाख मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत. मात्र, ही संख्या २० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासारख्या राज्यात सरकारने नोकर भरतीवर बंदी आणली आहे. मात्र, योगी आदित्यनाथ जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्या तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व नगर पंचायतींना आदेश देण्यात आले आहेत. महिला मजुरांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून त्यांना काम दिले जाणार आहे. विविध वस्तूंच्या उत्पादनाचे प्रशिक्षण त्यांना देण्याची तयारी करण्यात आली आहे. सरकार या उत्पादनांसाठी बाजारपेठही उपलब्ध करून देणार आहे